हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सध्याचे वातावरण पाहता पहाटे गारठा आणि दिवसा उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. पहाटे पारा दहा अंशांच्या खाली घसरत असला तरी दोन दिवसांपासून राज्यात ऊन देखील वाढले आहे. त्यामुळे पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती असताना ऐन हिवाळ्यात ही घाम निघत आहे. आज दिनांक 2 रोजी कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ञ् के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन दिवसात तापमान वाढणार असून त्यानंतर पुन्हा थंडी वाढणार आहे.
मंगळवारी दिनांक 1 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 4.7 अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात सहा अंश सेल्सिअस, जळगाव येथे 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय पुणे, नगर, नाशिक येथे देखील पारा दहा अंशापेक्षा कमी झाला आहे. उत्तर सोलापूर येथे चोवीस तासातील उच्चांकी 34.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तसेच सांगली, कोल्हापूर, पुणे ,धुळे ,रत्नागिरी ,सांताक्रुज ,वर्धा ,यवतमाळ, ब्रम्हपुरी, अकोला, परभणी येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात 13 ते 26 अंश यांची मोठी तफावत दिसून येत आहे.
देशाच्या ‘या’ भागात गारपिटीसह पावसाची शक्यता
दरम्यान देशाचा विचार करता, उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे देशाच्या सपाट भागावर येईल नीचांकी 3.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाले. आज उत्तर आरबी समुद्र आणि गुजरातच्या किनार्यालगत 60 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून भाजपाचा पुरवठा होत असल्याने उत्तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये वीज आणि मेघगर्जना गारपीटही पावसाची शक्यता आहे.