Quinoa Farming : क्विनोआ पिकाची लागवड करा; एक लाख रुपये क्विंटलपर्यंत असतो भाव!

Quinoa Farming One Lakh Per Quintal Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी नवनवीन पिकांचे उत्पादन (Quinoa Farming) घेण्याकडे आपला कल वळवत आहे. विशेष म्हणजे या नवीन पिकांना अधिकचा दर देखील मिळतो. ज्यामुळे त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. आज आपण अशाच एका क्विनोआ नावाच्या विदेशी धान्यांबाबत जाणून घेणार आहोत. ज्याची लागवड करत राजस्थानातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील दुष्काळी भागात काही शेतकऱ्यांनी या क्विनोआ पिकाची (Quinoa Farming) लागवड केल्याचे मागील काही काळात समोर आले आहे. या क्विनोआला बाजारात प्रति क्विंटल एक लाख रुपयांपर्यंतचा भाव मिळतो.

काय आहे क्विनोआ? (Quinoa Farming One Lakh Per Quintal Rate)

क्विनोआ हे पीक (Quinoa Farming) दक्षिण अमेरिकेतील एक प्राचीन धान्य आहे. हजारो वर्षांपासून त्या ठिकाणी त्याची लागवड केली जात आहे. मात्र सध्या भारतातील राजस्थानच्या मातीत हे पीक चांगलेच रुजले असून, अनेक शेतकरी त्या ठिकाणी क्विनोआच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहे. प्रामुख्याने राजस्थानच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये क्विनोआचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. क्विनोआ धान्यास दरही अधिकचा मिळतोय. ज्यामुळे राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचा ओढा या पिकाकडे वाढला असल्याचे सांगितले जात आहे.

किती मिळते उत्पन्न?

साधारणपणे क्विनोआ पिकाच्या लागवडीनंतर त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नसते. क्विनोआ हे पारंपारिक पीक आहे. मात्र, त्याला मिळणाऱ्या अधिकच्या दरामुळे ते इतर धान्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देणारे पीक ठरते. एक बिघ्यात 4 ते 5 क्विंटल उत्पादन मिळते. पिकाला योग्य वातावरण मिळाल्यास त्यात वाढ देखील होते. एका क्विंटल क्विनोआला एक लाख रुपये इतका दर मिळतो.

कसे लागते हवामान?

मागील काही काळापासून राजस्थानमधील शेतकऱ्यांची क्विनोआ शेती (Quinoa Farming) पाहून, अनेक राज्यांमध्ये हे पीक घेण्यासाठी शेतकरी प्रेरित होत आहे. सध्या राजस्थानात या पिकाची काढणी सुरु आहे. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाचा खर्च खुपच कमी असतो. रब्बी हंगामात या पिकाची लागवड केली जाते. तर उन्हाळयाच्या दिवसांमध्ये ते काढणीला येते. या पिकाला रात्रीला थंडी आणि दिवसा अधिक तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे राजस्थानच्या मातीत हे पीक चांगले रुजल्याचे सांगितले जात आहे.

क्विनोआचा वापर कसा करतात?

अलीकडे लोक आरोग्याच्या बाबतीत खुपच जागरूक झाले आहेत. विदेशात क्विनोआला सुपर फूड म्हटले जाते. इतकेच नाही तर अनेक अन्नधान्य तज्ज्ञ कुपोषणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी क्विनोआ हे सर्वोत्तम धान्य मानतात. क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्नचे प्रमाण असते. क्विनोआच्या पानांचा उपयोग भाजी म्हणून देखील केला जातो. काही लोक तांदळाप्रमाणे भात शिजवून क्विनोआचा आहारात समावेश करतात. तर काही भागांमध्ये क्विनोआच्या भाकरी बनवल्या जातात. तसेच क्विनोआचे सूप, खीर, लाडू आणि अनेक प्रकारचे पदार्थ देखील बनवले जाते. ज्यामुळे त्याला ‘पूर्णान्न’ म्हणून संबोधले जाते.