सांगली जिल्ह्यात २.८ लाख हजार हेक्टवर रब्बीचा पेरा; सव्वा लाख टन खतांची मागणी ,थेट बांधावर मिळणार खत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात होत असून 2 लाख 80 हजार हेक्टरवर पेरण्या होणार आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव पुर्व भागात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. हंगामात खते आणि बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे.

खतं थेट बांधावर

1 लाख 24 हजार 230 टन रासायनिक खतांची व 36 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी गटांच्या मागणीनुसार खते शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोच केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे बहुतांशी ठिकाणी रब्बीच्या पेरा सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा पावसाने वेळेत हजेरी लावल्याने खरीपाचा पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतू जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराने पीके वाया गेली होती.

त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बीच्या हंगामाकडे लक्ष लागले होते. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रब्बी हंगामाला सुरुवात होते, गेल्या आठवड्याभरापासून परतीचा पाऊसही बरत आहे, त्यामुळे रब्बीचा पेरा पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 2 लाख 80 हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. रब्बीतील ज्वारी, गहू, मका, हरभरा,करडई, सूर्यफूल कांदा आदीचा समावेश आहे. जिल्ह्यात 151 गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली, तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या 251 पर्यंत वाढली आहे. बियाण्यांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात 11 पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या पूर्व भागात दुष्काळी, मध्य भागात बागायती, जिरायत आणि पश्चिम भागात डोंगराळ भागाचा समावेश आहे. त्यात परतीच्या पावसावर रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्यात असून, शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवात झाली असून आतापर्यंत पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत.