हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर या भागात वादळी वाऱ्यासह काल पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज देखील राज्यातल्या दक्षिण मध्य भागात तसंच मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये या भागात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
दरम्यान आज पासून पुढील चार दिवसात केरळ माहेमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवसात कर्नाटक किनारपट्टी, लक्षदीप, तमिळनाडू तर 12 ते 14 मार्च दरम्यान कोकण, गोवा ,मध्य ,महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाटी आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस सुरूच राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
शेतीपिकांचे नुकसान
उन्हाळ्याच्या सुरवातीलाच होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे त्यामुळे काढणीस आलेला हरभरा,कांदा ,भाजीपाला ,मका ,ज्वारी , गहू या पिकांचे मोठे नुकसान झालेला पाहायला मिळाले. तर राज्यातील काही भागात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आजचे किमान तापमान
दरम्यान आज दिनांक 11 मार्च रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमधील किमान तापमानाची नोंद पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. पुणे 17.5, महाबळेश्वर 17.8, जळगाव 16.4, कोल्हापूर 23.3, मालेगाव 17.4, उस्मानाबाद 17.4, सोलापूर 22.7, नाशिक 16.4, सातारा 22.1 ,माथेरान 21, नांदेड 20.2, चिकलठाणा 19.4, जालना 19, परभणी 20.5, रत्नागिरी 25.4, सांताक्रुज 23.4, कुलाबा 24.2 ,हरनाई 24.6 आणि ठाणे 22.2.