येत्या ५ दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

thunder storm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने ८,९ जुलै नंतरच पावसाचे आगमन होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता आणखीच वाढली आहे. नुकतेच हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसात मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मातीला आद्रता मिळेल असे देखील होसाळीकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कोकणात पावसाचा प्रभाव कमी झालाय. पालघर, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. घाटमाथ्यावर ही अधून मधून पाऊस पडत होता. राज्यात गुरुवारी एक तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागडपाली येथे सर्वाधिक 30 मिलिमीटर पाऊस पडला तर कर्जत 22, म्हसळा 24 मिलिमीटर पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा इथे हलक्या सरी कोसळल्या. रायगड मध्ये सुधागड पाली 36 ,रत्नागिरी मधील चीपळून 21, गुहागर 15, संगमेश्वर 24 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं.

तर मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात अधूनमधून ऊन पडले होते. खानदेशातील जळगाव मध्ये पारोळा येथे 26 मीटर पाऊस पडला तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे 31, सातारा ते महाबळेश्वर येथे 27.2 मिलिमीटर पाऊस पडला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही पावसाचा फारसा प्रभाव नसल्याने भात लागवडीला सुरुवात झाली आहे. पुणे, नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, भागात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे.