हॅलो कृषी । बीजप्रक्रिया नेकमी कशासाठी आणि कशी केली जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. बीजप्रक्रिया म्हणजे नेमके काय? पेरणीपूर्वी एक विशिष्ट लक्ष ठेवून उत्पादन वाढीसाठी आणि कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी केलेली जैविक खताची, बुरशीनाशकांची, रासायनिक बुरशीनाशकांची किंवा कीटकनाशकाची बियाण्यावर केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय. बीजप्रक्रिया म्हणजे उत्पादन वाढीसाठी आणि कीटक नियंत्रणासाठी रामबाण उपाय आहे.
द्विदल धान्याच्या पिकावर बीजप्रक्रिया केल्यास उदारणार्थ- तूर, उडीद, मूग, सोयाबीन तर हवेतील नत्र स्थिर होतो, नत्राची उपलब्धता होते आणि रासायनिक पद्धतीने द्यायच्या नत्रात कपात होते. शिफारशीप्रमाणे जर किडनियंत्रण बीजप्रक्रिया केली तर संबंधित रोगापासून आपल्याला आपले पीक वाचवता येते. बऱ्याच रोगात बुरशीचा प्रादुर्भाव हा जमिनीतून होतो. तेव्हा बीजप्रक्रिया हा रामबाण उपाय ठरतो. त्याचप्रमाणे पिकाची उगवण चांगली करणे, पेरणी सुलभ करणे, बियाण्याची सुप्तावस्थता कमी करणे यासाठी देखील बीजप्रक्रिया केली जाते.
बीजप्रक्रिया करताना कोणती पद्धत व कोणती काळजी घेतली जावी हे जाणून घेऊ. सगळ्यात आधी बीजप्रक्रिया करताना बुरशीनाशक व कीटकनाशक यांची बीजप्रक्रिया करावी. मग अर्धा तास थांबून जैविक खत व जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. घरच्या घरी बीजप्रक्रिया करतांना हातात हॅन्डग्लोज घालावे. बीजप्रक्रिया करताना 100 ग्राम गुळ कोमट पाण्यात विरघळून ते पाणी थंड होऊ द्या, निविष्ठा बियाण्यावर चिटकून राहण्यासाठी ह्या गुळाच्या पाण्याचा त्यावर छिडकाव करा. बीजप्रक्रिया करतांना कृषी विद्यापीठ यांनी शिफारशी केलेल्या तसेच लेबल क्लेम केलेल्या निविष्ठांचा वापर करा.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7