हॅलो कृषी ऑनलाईन : कोथिम्बिर ही आपल्या रोजच्या अन्नपदार्थामधील महत्वाचा घटक आहे. कोथिंबिरीचा वापर सर्रास केला जातो. तर आज आपण कोथिंबीरीमध्ये येणाऱ्या प्रमुख रोगांविषयी चर्चा करणार आहोत.
1)भुरी(Powdery mildew)
रोग लक्षणे:-ते कोवळ्या पानावर भागावर लहान, पांढरे, पावडरचे ठिपके दिसतात नंतर आकाराने वाढतात आणि पानांच्या पृष्ठभागाचा मोठे होत-होत पूर्ण पान व्यापतात.प्रभावित पाने आकारात कमी होतात आणि विकृत होतात. या रोगामुळे प्रभावित झाडांमध्ये बीज निर्मिती होऊ शकत नाही.
प्रसार :-बुरशी बीजणूंच्या(क्लीस्टोथेशीयाच्या) रूपात पिकाच्या अवशेषात टिकून राहू शकते आणि हवेद्वारे लांब अंतरावर प्रसार होतो.
अनुकूल परिस्थिती: रोगाची सुरवात उच्च आर्द्रता आणि मध्यम तापमान (ढगाळ हवामान) असे अनुकूल असताना होत असते; सावली असलेल्या भागात संसर्ग झपाट्याने पसरतो.
२)विल्ट/मर रोग लक्षणे:-
लक्षणे – शेंडा सुकून जातो,पाने करपल्या सारखी दिसतात. रोप उपसल्यास मुळाचा बद्दलल्याचा जाणवतो.ज्या रोपांना प्रादुर्भाव कमी प्रमाणात झालेला असतो त्या मध्ये पाने वाळून रोपांची वाढ थांबते.अनेकवेळा झाडाला बिया धरत नाही.जरी बिया धरल्या तर हलक्या व कमी प्रतीच्या असतात.पिकामध्ये सुरवातीस जर या संक्रमण झाले तर गँभीर नुकसान होऊ शकते.
प्रसार:-हा रोग मातीजनीत बुरशीमुळे होतो आणि प्राथमिक संसर्ग मातीमध्ये असलेल्या बीजाणूंमुळे होतो. मुळाद्वारे या रोगाचा संसर्ग रोपास होतो
अनुकूल परिस्थिती:-जास्त मातीचा ओलावा किंवा मातीचे तापमान या गोष्टी संक्रमणासाठी अनुकूल आहे.
३)खोड/पाने फुगणे:-
रोगाची लक्षणे:-हा रोग फुले,पान,देठ, तसेच फळावर गाठीच्या स्वरूपात दिसून येतो.संक्रमित पानांच्या शिरा सुजलेल्या स्वरूपाचे दिसतात.या गाठी नंतर फुटतात त्यामुळे गँभीर लक्षणे दिसायला लागतात. गँभीरपणे प्रभावित झालेली झाडामध्ये मर होऊ शकते. मातीमध्ये जास्त प्रमाणात ओलावा असल्यास,विशेषत: जास्त सावली असलेल्या ठिकाणी, जेव्हा स्टेम कडक आणि रसाळ राहण्यास अपयशी ठरतो, तेव्हा गाठी असंख्य असतात.