तुरीच्या दरात धीम्या गतीने वाढ, अमरावतीत मिळाला 6800 चा कमाल भाव ; पहा आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला हमीभाव केंद्रापेक्षा जास्त भाव मिळत असला तरी मात्र सध्या म्हणावे तसे दर तुरीला मिळत नाहीयेत राज्यातील कारंजा ,यवतमाळ ,लातूर, हिंगोली , जालना अशा काही बाजारपेठेत तुरीला कमाल भाव हमीभाव केंद्रांपेक्षा जास्त मिळत आहे. मात्र सर्वसाधारण दर हे 5900 ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यानच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असल्याने अद्यापही शेतकरी तूर साठवणुकीला पसंती देत आहेत.

एक ते दीड महिन्यानंतर तुरीच्या दरात वाढीची शक्यता

देशात यंदा लहरी हवामानामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे तर दुसरीकडे मात्र विक्रमी आयात झाल्याने सध्या म्हणावे तसे दर तुरीला मिळत नाहीयेत. मात्र जसजसे उत्पादन घटीचे चित्र स्पष्ट होईल तसे तुरीच्या दरात देखील सुधारणा होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. देशात यंदा तूर उत्पादन कमी होऊन 30 ते 33 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मात्र उत्पादन घटूनही आयातीमुळे दर दबावात आहेत. परंतु देशात उत्पादन घटल्याने आयात दारही कमी दरात तुर विक्री करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एक ते दीड महिन्यानंतर तुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे असं जाणकारांचं मत आहे.

आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीला कमाल 6800 रुपयांचा भाव मिळाला आहे आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तुरीची 1362 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. याकरिता किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल साठी मिळालेला आहे तर सर्वाधिक आवक ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती इथंच झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 15-2-22 तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2022
शहादाक्विंटल4380057515501
दोंडाईचाक्विंटल41521160015983
राहूरी -वांबोरीक्विंटल12560058005700
सिल्लोडक्विंटल20530059005600
उदगीरक्विंटल1300651167116611
भोकरक्विंटल86500060295515
कारंजाक्विंटल2000543066506260
अचलपूरक्विंटल940580062506025
परळी-वैजनाथक्विंटल16580060005900
हिंगोलीगज्जरक्विंटल250590066006250
मुरुमगज्जरक्विंटल74570062005950
गंगापूरहायब्रीडक्विंटल85542160505850
सोलापूरलालक्विंटल9500059005000
जालनालालक्विंटल167580063006100
अकोलालालक्विंटल3426500066856100
अमरावतीलालक्विंटल7362640068006600
जळगावलालक्विंटल28570059005900
यवतमाळलालक्विंटल723570066006150
मालेगावलालक्विंटल101450061365936
चिखलीलालक्विंटल1405580064016100
नागपूरलालक्विंटल6567600067006450
पवनीलालक्विंटल42600060006000
मलकापूरलालक्विंटल3550575067506455
मेहकरलालक्विंटल1090570065006100
वरोरा-खांबाडालालक्विंटल37480060005200
नांदगावलालक्विंटल41480060505801
आंबेजोबाईलालक्विंटल1621162116211
निलंगालालक्विंटल35610063006200
औराद शहाजानीलालक्विंटल71620064006300
तुळजापूरलालक्विंटल30615061506150
चांदूर-रल्वे.लालक्विंटल190600064756300
देवळालालक्विंटल4510058005605
बोरीलालक्विंटल14600062506045
बसमतलोकलक्विंटल35460561555783
काटोललोकलक्विंटल525500063405800
जालनापांढराक्विंटल2180540064726200
माजलगावपांढराक्विंटल237570062416100
बीडपांढराक्विंटल97547362326075
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल10600061006000
गेवराईपांढराक्विंटल180560061595950
तळोदापांढराक्विंटल6567058725850
केजपांढराक्विंटल23450062006100
औराद शहाजानीपांढराक्विंटल103620064606330
तुळजापूरपांढराक्विंटल25615061506150