सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा, शेतकऱ्यांना काय आहे मोलाचा सल्ला..?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सकारात्मकता दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. दिवसाकाठी १०० ते १५० रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमागे होत आहे. मागणी वाढत असल्यामुळे हा बदल होत आहे. पण जर आवक वाढली तर याचे विपरीत परिणाम बाजारावर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके काय केले पाहिजे ? याबाबत कृषी अधिकारी आणि व्यापारी यांची मते जाणून घेऊया…

हंगामाच्या सुरवातीपासून सोयबीनच्या दरात घट होती. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक असून शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यात या पिकाचा मोठा वाटा समजला जातो. पण घटत्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली होती. दिवाळीनंतर बाजारपेठेत बदल दिसत असून दरात वाढ होत आहे.

सोयाबीनची आवक ही सुरवातीपासून कमीच राहिलेली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला 10 ते 15 हजार क्विंटलची आवक होत आहे. मात्र, मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. अणखीन काही दिवस सोयाबीनची साठवणूक केली तर वाढत्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अणखीन काही दिवस शेतकऱ्यांनी दर वाढीची वाट पाहणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

साठवणूकीचा होणार फायदा
हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला होता. काही शेतकऱ्यांनी तर यंदा प्रथमच शेती माल तारण योजनेचा फायदा घेतला होता. बाजारपेठेचे गणित कळल्याप्रमाणे शेतकरी हे उडीद व इतर पिकांची विक्री करीत होते पण सोयाबीनच्या साठवणूकीवर भर देत होते. त्या दरम्यान, शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आताच्या दरावरुन निदर्शनास येत आहे.

असे राहिले आहेत सोयाबीनचे दर
–हंगाम सुरु होण्यापूर्वी सोयाबीनला जूनमध्ये 8 हजार 900 चा दर होता.
–मात्र, सोयाबीन काढणीच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली होती.
–त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे दर गगणाला भिडणार असेच चित्र निर्माण झाले होते.
–शिवाय, मुहूर्ताच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या होत्या.
–कारण मुहूर्ताच्या सोयाबीनला हिंगोली, बार्शी आणि अकोला बाजार समितीमध्ये 11 हजाराचा भाव मिळाला होता.
–मात्र, तो काही दिवसांपूरताच मर्यादीत राहिला होता. त्यानंतर मात्र, ऑक्टोंबर महिन्यात तर सोयाबीनचे दर हे 4 हजार 800 वर येऊन ठेपले होते.
–या हंगामात शेतकऱ्यांनी उच्चांकी आणि सर्वात कमी असे दोन्हीही दर पाहिले आहेत. पण आता दरात सुधारणा होत असल्याने दिलासा मिळत आहे.

टप्प्याटप्प्याने सोयीबीनची विक्री तरच फायदा

सोयापेंडची आयात होऊन देखील सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून काही काळ दरवाढीची प्रतिक्षा केली तर फायदा हा होणारच आहे. पण या दरम्यान वाढीव दरामुळे बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली तर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयीबीनची विक्री केली तरच फायदा होणार आहे.

संदर्भ टीव्ही -९