Soybean Rate: जाणून घ्या, कसे आहेत राज्यातील प्रमुख बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन (Soybean Rate) हंगाम यंदा हा विजयादशमीपासून सुरू झाला असून आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Rate) पाच हजाराचा टप्पा देखील गाठत नसल्याचे पाहण्यात येत आहे. यामुळे भाव वाढतील या आशेने साठवून ठेवलेले सोयाबीन (Soybean) देखील आता शेतकर्‍यांनी विक्रीसाठी बाहेर काढले आहे (Soybean Rate).

परिणामी राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीन हंगाम (Soybean Season) अंतिम टप्प्यात आला असतानाही मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये (Bajar Samiti) सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनचा भाव (Soybean Rate)

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला किमान 4300 रुपये प्रति क्विंटल, कमाल 4350 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती: (Krushi Utpanna Bajar Samiti, Akola) मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4000 कमाल 4495 आणि सरासरी 4400 असा भाव मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4300 रुपये प्रति क्विंटल, कमाल 4427 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4363 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल, कमाल 4485 आणि सरासरी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार 180, कमाल 4500 रुपये आणि सरासरी 4375 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार 23, कमाल 4497 आणि सरासरी ४३८१ रुपयाचा भाव मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3500, कमाल 4573 आणि सरासरी चार हजार 404 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4431, कमाल 4530 आणि सरासरी 4480 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.