हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक जणांचा शेतीकडे ओढा वाढताना (Success Story) दिसून येत आहे. उच्चशिक्षित तरुणच नाही तर सरकारी नोकरीमध्ये स्थिर स्थावर असलेल्या अनेक जणांना देखील शेतीमध्ये रस वाढत आहे. प्रामुख्याने कोरोनाच्या काळात अनेक जण गावी गेल्याने, त्यांचे गावी शेतीसोबत एक नाते निर्माण झाले. अशातच अनेक जण सध्या आपला नोकरी व्यवसाय सांभाळून शेती करताना दिसून येत आहे. आज आपण अशाच एका शिक्षक असलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. ज्यांनी जांभूळ शेतीतून लाखोंची कमाई केली आहे.
दुष्काळी पट्ट्यात फुलवले नंदनवन (Success Story Of Jambhul Farming)
अशोक पडोळे असे या शेतकऱ्याचे नाव (Success Story) असून, ते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील रहिवासी आहेत. मराठवाडा भाग म्हटले आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम दुष्काळी पट्टा म्हणून चित्र उभे राहते. मराठवाडा विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पावसाचे कमी प्रमाण असल्याने अल्प पाण्यावर शेती करावी लागते. मात्र, असे असतानाही या भागातील काही शेतकरी शेतीचे व्यवस्थित नियोजन करत, शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. त्यापैकीच शेतकरी अशोक पडोळे हे देखील एक आहे.
50 गुंठ्यात जांभूळ लागवड
शेतकरी अशोक पडोळे हे पेशाने शिक्षक असताना, केवळ शाळा न करता आधुनिक शेतीकडे वळले. त्यांनी पत्नीच्या मदतीने ५० गुंठे शेतात जांभूळ शेती फुलवली. त्यांना सध्या खर्च हजारांत झाला असून, उत्पन्न आता लाखात मिळत आहे. अशोक पडोळे हे पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आधुनिक शेती कशी करता येईल, यासाठी मित्रांसोबत चर्चा करून जांभूळ शेतीचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे.
किती मिळतंय उत्पन्न?
शेतकरी अशोक पडोळे सांगतात, “तीन वर्षांपूर्वी आपण छत्तीसगड येथून ३८० झाडे आणून १२ बाय १० वर लागवड केली. शेत तलावाच्या माध्यमातून ड्रीपच्या मदतीने पाण्याची सोय केली. सध्या आपली नियमित तोड्याखाली जांभूळ तोडणी सुरु असून, अहमदनगर येथील बाजारपेठेत १८० रुपये किलो भाव मिळत आहे. ज्यातून आतापर्यंत आपल्याला १ लाख ८० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.” जांभूळ शेती ही आयुर्वेदिक असून, कमी मेहनतीची शेती आहे. शाळा संभाळत पत्नी रूपाली यांच्या मदतीने ५० गुक्यांत जांभूळ बागेतून आर्थिक उलाढाल झाली आहे. असेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे.