हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याचे दिवस म्हटले की शेतकऱ्यांना (Success Story) कमी पाण्यात शेती करणे क्रमप्राप्त ठरते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक घेणे अनिवार्य असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त नफा मिळण्यास मदत होते. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या सव्वा एकर शेतामध्ये हळद पिकामध्ये मिरचीचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना हळद पिकातून मोठी आर्थिक कमाई (Success Story) झाली असून, मिरचीच्या पिकातून देखील चांगले उत्पन्न मिळाले आहे.
2500 रुपये दराने बेणे खरेदी (Success Story Of Turmeric Farmer)
सुभाष आत्माराम कौसल्ये असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते नांदेड जिल्ह्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. शेतकरी सुभाष यांनी सुरुवातीला सव्वा एकर शेतीसाठी अडीच हजार रुपये (Success Story) क्चिटलप्रमाणे आठ क्विंटल हळद बेणे विकत घेतले. त्यानंतर शेताची चांगली मशागत करून घेत, सव्वा एकर शेतात शेणखत टाकले. त्यासोबतच लिंबोळी पेंडेचाही वापर केला. हळद काढणीच्या वेळेस मजुराचा वापर केला. पारंपारिक ऐवजी मसाले पिकांची लागवड फायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सेलम जातीची निवड
शेतकरी सुभाष कौसल्ये सांगतात, आपण हळद लागवडीसाठी सेलम जातीची निवड (Success Story) केली. लागवडीनंतर काही दिवसांनी दोन वेळेस माती लावणे, तीन वेळेस वखरणी केली. ज्यामुळे अधिक उत्पादन मिळण्यास मदत झाली. याशिवाय हळदीसाठी लिंबोळी पेंड, डीएपी, पोट्याश, सुपर दामोदर या सर्व मिश्र खतांचा वापर केला. इतकेच नाही तर कमी पाण्यात दोन पिके घेता यावी म्हणून आपण हळदीसोबत मिरचीचे आंतरपीक देखील घेतले.
किती मिळाले उत्पन्न?
शेतकरी सुभाष कौसल्ये सांगतात, आपल्याला सव्वा एकर शेतीमध्ये 50 क्विंटल हळद उत्पादन मिळाले आहे. शेणखत व लिंबोळी अर्कचा वापर केल्यामुळे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. यंदा हळदीला बाजारही चांगले होते. ज्यामुळे आपण एकूण सव्वा एकरातील हळद विक्रीतून आठ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर हळद उत्पादन घेण्यासाठी आपल्याला 80 हजार रुपये इतका खर्च झाला होता. याशिवाय हळद पिकामध्ये मिरचीचे आंतरपीक घेतले. त्यातून देखील आपल्याला 30 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.