हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतीमध्ये कष्टच नाही तर कष्टासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जाण आणि आधुनिक साधनांचा वापर देखील तितकाच महत्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतीला कष्टासह आधुनिकतेची जोड देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. शेतकरी रामदास काळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावचे रहिवासी आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी आपल्या एक एकरात 25 टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. ज्यातून त्यांना पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपले टरबूज दुबईला निर्यात (Success Story) केली आहेत.
प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख (Success Story Of Watermelon Farming)
शेतकरी रामदास काळे यांची एक प्रगतिशील शेतकरी (Success Story) म्हणून ओळख आहे. त्यांना 2019-20 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेतकरी रामदास काळे हे आपल्या शेतात केळी, डाळिंब, टरबूज अशा प्रकारची फळ पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. पारंपरिक ऊस शेतीबरोबरच कांदा लागवडीतूनही त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले आहे. शेती करीत असताना योग्य नियोजन, खर्चाची बचत व पिकाची योग्य काळजी घेतल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते व आपल्याला चांगला नफा मिळू शकतो, असे ते सांगतात.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागवड
शेतकरी रामदास काळे सांगतात, आपण यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या शेतात कलिंगडाची लागवड केली होती. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घेतली. एक एकरात दोन ट्रॉली कुजलेले शेणखत टाकले. त्यानंतर सात फूट अंतरावर बेड तयार करून घेतले. याशिवाय लागवडीपूर्वी खतांचा बेसल डोस दिला होता. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. ज्यामुळे आपल्याला कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळाले असल्याचे ते सांगतात.
खर्च किती? उत्पन्न किती?
शेतकरी रामदास काळे सांगतात, आपल्याला एका एकरात टरबुजाचे पीक घेण्यासाठी रोपे, शेणखत, रासायनिक खते, विद्राव्य खते, बुरशीनाशके, कीटकनाशके, सापळे यासाठी एकूण 75 हजार रुपये खर्च आला. ज्याद्वारे सध्या आपले टरबूज काढणीला आले असून, त्यातून 19 टन निर्यातक्षम टरबुजाचे उत्पादन मिळाले आहे. काही टरबूजाला अकरा हजार रुपये प्रति टन बाजारभाव मिळाला. तर काही टरबूज हे स्थानिक व्यापाऱ्यांना सहा हजार रुपये प्रति टन दराने विकली. ज्यातून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळाले. खर्च वजा आपल्याला दोन महिन्यात एक एकरात एक लाख सत्तर हजार रुपये निव्वळ नफा मिळाल्याचे ते सांगतात.