Success Story : धान पिकाला फाटा; शिंगाड्याची यशस्वी शेती; गडचिरोलीच्या शेतकऱ्याचा प्रयोग!

Success Story Of Shingada Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी शेतीमध्ये अनके नवनवीन प्रयोग करताना (Success Story) दिसून येत आहे. शेतीमध्ये नवनवीन पिके घेतली जात आहे. विशेष म्हणजे या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी पारंपरिक धान पिकाला फाटा देत पीक पद्धतीत बदल करत, शिंगाड्याच्या यशस्वी शेतीतून (Success Story) आर्थिक प्रगती साधली आहे.

धान पिकाला फाटा (Success Story Of Shingada Farming)

डुलीचंद नारायण पटले असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते गडचिरोली जिल्ह्यातील बिहिरिया येथील रहिवासी आहेत. शेतकरी पटले यांची स्वतःची तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात भात पीक, रब्बी हंगामात गहू अशा पिकांची ते लागवड करतात. धान पीक म्हटले की जास्त व हमखास उत्पादनासाठी संरक्षित सिंचनाची गरज असते. धानाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाधानी नव्हते. ज्यामुळे त्यांनी पीक पद्धतीत बदल म्हणून शिंगाड्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

किती मिळाले उत्पन्न?

शेतकरी डुलीचंद पटले सांगतात, यापूर्वी आपल्याला धान या पारंपारीक पिकातून मिळणारे उत्पन्न हे खूपच तुटपुंजे होते. मात्र, ज्यातून उत्पादन खर्चही मिळणे अवघड जात होते. ज्यामुळे शिंगाडा शेतीकडे वळलो, शिंगाडा पिकाला कोणत्याही प्रकारचा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मशागतीचा खर्च कमी येतो. शिंगाड्याची शेती करून आपण आठ महिन्यांत दीड लाखांचे उत्पन्न घेतले. यात त्यांना 90 हजार रुपयांचा शुद्ध नफा झाला आहे. बोडीमध्ये शिंगाड्याची यशस्वी शेती करून, त्यांनी शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करून धान पिकाला पर्याय सुद्धा दिला आहे.

व्यापाऱ्यांना थेट बांधावर विक्री

विशेष म्हणजे शिंगाड्याची बाजारात विक्री करण्याची गरज नाही. व्यापारी थेट बांधावर येऊन शिंगाडे खरेदी करतात. मागील हंगामात शिंगाड्याच्या शेतीतून 1 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातून खर्च वगळता 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्यानंतर बोडीत पाणी शिल्लक असल्याने त्यात मत्स्यबीज सोडले. ते आता एक ते दीड किलोपर्यंत झाले आहे. त्यामुळे बोडीचा तिहेरी लाभ झाला, असे शेतकरी डुलीचंद पटले यांनी सांगितले आहे.