राज्यात उन्हाची तीव्रता कायम , काही ठिकाणी ढगाळ वातावरण

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज एक मार्च २०२२ आज पासून अधिकृतरित्या हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला. मात्र यंदाच्या वर्षी उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागली असून तापमानातही सतत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान येथून पुढेही तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा अनुभवायला मिळत आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून राज्यातील काही शहरांमध्ये तापमान हे 35 अंश यांच्यावर नोंदले गेले आहे. दरम्यान आज एक मार्च रोजी राज्यात किमान तापमान पुणे इथं 13.6 डिग्री सेल्सियस इतके नोंदविण्यात आल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये हे किमान तापमान 17 आंशांच्या आत आहे.

दरम्यान हिमाचल प्रदेशामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर दिनांक 2 आणि 3 रोजी पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच दिल्ली येथे ढगाळ हवामान आज अनुभवयाला मिळणार आहे.

राज्यातील कमान तापमान खालीलप्रमाणे

राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी रोजी नोंदवले गेलेले कमाल तापमान पुढील प्रमाणे : पुणे 34.2, सातारा 34.4, परभणी 35.2, सांगली 35.4, सोलापूर 36.2, कोल्हापूर 34.36, मालेगाव 36.6, उस्मानाबाद 34.5, आणि जेऊर 35 तसेच जळगाव 35. ७ तापमान नोंदवण्यात आले आहे.