संत्री-मोंसबीतील फळगळ व फळसडीमागच्या ‘या’ अज्ञात शत्रुला वेळीच आवरा नाहीतर होईल मोठ नुकसान

orange
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: संत्रा, मोसंबी व इतर फळपिकांमधील फळगळ व फळसडी होण्यामागे फळमाशी कारणीभूत असते. फळमाशीच्या प्रादुर्भावा संबधित देश- विदेशातील विविध विद्यापिठांच्या संशोधनानुसार संत्रा तसेच इतर फळपिकांमध्ये ४०-८०% नुकसान एकट्या फळमाशीमुळे होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
फळमाशीवर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही. याच कारणामुळे फळं परिपक्कवतेच्या काळात संपुर्ण बागेत फळगळ व फळसड झाल्याचे पहायला मिळते. मात्र त्यावेळी यावर कोणताही मार्ग न सापडल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पहायला मिळते.

यावर उपाय काय ?

पहिल्या पावसानंतर म्हणजे जुन महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी फळमाशीचे सापळे आपल्या शेतात लावावेत. एकरी ९ ते १० सापळे लावण्याचा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जातो. त्यामुळे फळमाशीवर आटकाव घालता येऊन मोठं नुकसान टाळता येत. हे सापळे बाजारात स्वत दरात उपलब्ध असून कमी खर्चात जास्त प्रभावी उपात करता येतो.