राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 30 अंशांच्या वर ; सोलापुरात सर्वाधिक 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात आता थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात हळूहळू वाढ होते. महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत असून अनेक भागात तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढतो आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झालेली आहे. अनेक जिल्ह्यात तापमान पारा 30 अंशाच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. सोलापूर, सांगली, परभणी, पुणे, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सोलापुरात २१ फेब्रुवारी रोजी ३५. ८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

आज ‘या’ हलक्या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला सिक्कीम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, वायव्य भारतातील बहुतांश भागात तापमानात किंचित वाढ जाणवू शकते, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
तर, पुढील तीन दिवस जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.