सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, बाजारपेठेवर काय परिणाम ?

Soybean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात दर दिवशी १०० -१५० रुपयांची वाढ होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे . बुधवारी अकोला बाजार समितीत सोयाबीनचा दर ८००० वर गेला होता. त्यामुळे सोयाबीनला आधीक चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सध्या तरी सोयाबीनच्या साठवणुकीवर निर्बंध नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांकडून तसेच प्रक्रिया उद्योजकांकडून सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. तसेच दृष्टी वाढ होण्याचे संकेत आहेत.

सरकाचे निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचे
–सोयाबीनची बाजारपेठेत आवक सुरु होताच आयात केलेली सोयापेंडही दाखल झाली होती.
–त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली होती.
–त्यामुळे दर वाढणार का नाही याबाबत शेतकरीही चिंतेत होते. सरकारही शेतकरी हीताचे निर्णय घेत आहे.
–मध्यंतरी खाद्य तेलाच्या दरावर नियंत्रण रहावे म्हणून तेवबियांच्या साठवणूकीवर निर्बंध लादण्यात आले होते.
— त्यामुळे व्यापारी, उद्योजक हे सोयाबीनचू मर्यादितच खरेदी करीत होते.
–पण आता साठवणुकीवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.
–त्यामुळे सोयाबीनची साठवणूक तर होत आहेच शिवाय प्रक्रिया उद्योजकांकडून मागणीही वाढत आहे.

बाजरपेठेत काय होईल ?

— व्यापारी, प्रक्रिया उद्योजक किंवा स्टॅाकिस्ट यांच्यावर सोयाबीन साठवणुकीबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.
–त्यामुळे सोयाबीनच्या साठवणुकीसाठी मागणी वाढणार असल्याने त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे.
–आतापर्यंत केवळ प्रक्रिया उद्योजक हेच लागेल त्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करीत होते.
–पण आता भविष्यात दर वाढतील या भितीने अधिकची खरेदी करुन ठेवतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

संदर्भ : टीव्ही ९