उष्मा वाढला…! राज्यातील कमाल तापमान 35 अंशांच्या वर

heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अंशतः ढगाळ हवामान आणि उष्ण झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पारा 35 अंशांच्या पार पोहोचला आहे. राज्याच्या किमान तापमानातही वाढ होत आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अंदमान निकोबार बेटांवर वादळी पाऊस
मलक्काची सामुद्रधुनी आणि दक्षिण अंदमान समुद्र परिसरावर समुद्रसपाटीपासून 8.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या वऱ्यांच्या प्रभावमुळे मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत ही प्रणाली श्रीलंकेच्या किनार्‍याकडे येण्याचे संकेत आहेत. आज पासून अंदमान-निकोबार बेटांवरती वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील कमाल तापमान खालीलप्रमाणे
रविवार दिनांक 27 रोजी नोंदविण्यात आलेले राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान पुढील प्रमाणे ठाणे 34, परभणी 35.2, सांगलीत 35.6, सोलापूर 35.2, कोल्हापुर 34.36, मालेगाव 36, पुणे 34.2 ,सातारा 34, जळगाव 36, आणि उस्मानाबाद 35 अंश सेल्सिअस.