पंतप्रधान पीक विमा योजनेला राज्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ ;जाणून घ्या महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषि ऑनलाईन : पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भात महत्त्वाची माहिती आता पुढे आलेली आहे पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढवण्यात आला 23 जुलै पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला प्रस्ताव कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र शासनाकडे पाठवला होता आता त्याला मंजुरी मिळाली आहे.

 

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अन्नधान्य पीक गळित धान्य पिके आणि नगदी पिकांना या योजनेद्वारे विमा संरक्षण दिले जातात यात खरिपात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांमध्ये भात, खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका यांचा समावेश होतो गळित धान्य पिकांमध्ये भुईमूग काळे तीळ सूर्यफूल सोयाबीन तर नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा यांचा समावेश होतो. खरीप हंगामाकरिता विमा संरक्षित रकमेचे पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरायचा आहे. तर रब्बी हंगामाकरिता तितकाच म्हणजे पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरायचे उर्वरित हप्त्याची रक्कम आणि राज्य शासनाकडून दिली जाणार आहे.

23 जुलै 2021 पूर्वी रजिस्ट्रेशन करा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना पिकाच्या नुकसान भरपाई म्हणून विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचीही दखल सरकारने घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रकल्प अधिकारी व सर्व्हेवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रकल्प अधिकारी आणि सर्वेक्षण करणारे केवळ फक्त पंतप्रधान पीक विमा योजनेचे काम करतात. याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपनीने जिल्हा व ब्लॉक स्तरावरही आपल्या कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. सर्व शेतकर्‍यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने तक्रार निवारण समिती देखील गठित केली आहे. ही तक्रार निवारण समिती जिल्हास्तरावर कार्यरत आहे.

पीक विमा नको असेल तर बँकेला लेखी माहिती द्या

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही देशातील सर्व शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक आहे. जे शेतकरी बँकेतून कर्ज घेतात आणि जर त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर त्यांना 23 जुलै 2021 पर्यंत ही माहिती त्याच्या बँकेला लेखी स्वरुपात द्यावी लागेल. त्यानंतर त्या शेतकर्‍याला या योजनेतून वगळण्यात येईल. जर शेतकर्‍याने बँकांना काही माहिती दिली नाही तर या योजनेंतर्गत शेतकर्‍यांची ही नोंदणी बँकेमार्फत केली जाईल. आणि विम्याच्या प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक अकाऊंट मधून कपात केली जाईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणारे सर्व शेतकरी ग्राहक सेवा केंद्र किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत अर्ज करू शकतात.

खरीप पीक विमा योजना 2021 संबधित महत्वाची माहिती

–कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास देशातील शेतकर्‍यांना विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे.

–आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतक्यांना लाभ मिळाला आहे.

–पहिल्या तीन वर्षात सुमारे 13000 कोटी रुपयांचे प्रीमियम शेतकर्‍यांनी जमा केले होते.

–त्या बदल्यात त्यांना 60000 कोटी रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळाला आहे.

–या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. आणि त्याची जाहिरात सुद्धा केंद्र सरकार द्वारा केली जाते.

–ही योजना 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.

–या योजनेअंतर्गत हक्क प्रमाण 88.3 टक्के आहे.

–या योजनेचा शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत संपर्क साधला जातो.

–या योजनेत फेब्रुवारी 2021 मध्ये काही दुरुस्तीदेखील करण्यात आल्या आहेत. जेणेकरून सर्व शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देता येतील.

–सुधारित प्रधान मंत्री फसल विमा योजनेनुसार ज्या राज्यांमध्ये राज्य अनुदानाची देयके जास्त काळ विलंबित आहेत त्यांना या योजनेत भाग घेता येणार नाही.

–विमा कंपनीकडून प्राप्त झालेल्या प्रीमियमची रक्कम माहिती, शिक्षण आणि दळणवळणाच्या कामांसाठी खर्च केली जाते.

–या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्रीय सल्लागार समिती देखील गठित केली गेली आहे.

–प्रधान मंत्री पीक विमा योजना आधार कायदा 2016 अंतर्गत चालविली जाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभधारका जवळ आधार क्रमांक असणे बंधनकारक आहे.

–सर्व शेतकर्‍यांना कोणत्याही आपत्तीची चिंता न करता शेती करण्यास उद्युक्त करणे हे pik vima ही योजना राबविण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.

पीक भरावायची रक्कम

तांदूळ 713.99 रुपए प्रति एकर
मक्का 356.99 रुपए प्रति एकर
बाजारी 335.99 रुपए प्रति एकर
कापूस 1732.50 रुपए प्रति एकर
गहू 409.50 रुपए प्रति एकर
बार्ली 267.75 रुपए प्रति एकर
हरभरा 204.75 रुपए प्रति एकर
मोहरी 275.63 रुपए प्रति एकर
सूर्यफूल 267.75 रुपए प्रति एकर

पीक विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्कम

पीक मिळणारी रक्कम

तांदूळ 35699.78 रुपये प्रति एकर
मक्का 17849.89 रुपये प्रति एकर
बाजरी 16799.33 रुपये प्रति एकर
कापूस 34650.02 रुपये प्रति एकर
गहू 27300.12 रुपये प्रति एकर
बार्ली 17849.89 रुपये प्रति एकर
हरभरा 13650.06 रुपये प्रति एकर
मोहरी 18375.17 रुपये प्रति एकर
सूर्यफूल 17849.89 रुपये प्रति एकर

खरीप पीक विमा 2021 साठी आवश्यक कागदपत्र

–शेतकर्‍यांचे ओळखपत्र

–आधार कार्ड

–रेशन कार्ड

–बँक खाते पासबूक

–शेतकर्‍याचा पत्ता दाखला (जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र)

–भाड्याने शेतात जर शेती केली असेल तर त्या शेताच्या मालकाशी केलेल्या कराराची प्रत

–शेत खाते क्रमांक / खसरा क्रमांक सात बारा व आठ अ

–अर्जदाराचा फोटो

योजनेच्या अधिक माहितीसाठी https://pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.