हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याच्या बाजाराचा विचार करता तूर बाजरात आवक वाढली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तुरीला कमाल ६६०० रुपयेच भाव मिळतो आहे. तुरीला याहून अधिक भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या खरिपातील कापसाला चांगला भाव मिळतो आहे. अतिवृष्टी आणि तापमानातील बदलामुळे तुरीच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. त्यामानाने तुरीला अधिक चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त बाजार भावानुसार आज तुरीला सर्वाधिक सहा हजार सहाशे एक रुपयांचा कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तुरीचे 75026 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5500 रुपये कमाल भाव 6601 आणि सर्वसाधारण भाव 6051 इतका मिळाला आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे आवकही जास्त प्रमाणात झाला आहे आणि तुरीला दरही चांगला मिळाला आहे.
(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )
आजचे 9-2-22 तूर बाजारभाव