आज काबुली चण्याला मिळाला कमाल 9700 रुपयांचा भाव ; इतर हरभऱ्यासाठी मात्र अद्याप ‘वेट अँड वॉच’ ची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा मोठा पेरा झाला आहे. सुदैवाने उत्पादनही चांगले आहे. मात्र हवा तसा दर अद्यापही हरभऱ्याला मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मात्र काबुली चण्याला चांगला दर मिळतो आहे. काबुली चण्याचा दर मागील आठवड्यात कमाल ८ हजार रुपये होता मात्र आज काबुली चण्याला 9700 रुपयांचा भाव प्रति क्विंटल साठी मिळाला आहे.

आज नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याला कमाल 9700 रुपयांचा दर मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज काबुली चण्याची 148 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6300 कमाल भाव 9740 सर्वसाधारण भाव सात हजार 100 रुपये दर मिळाला. तर लोकल हरभऱ्याचा दर कमाल पाच हजार 700 रुपयांपर्यंत मिळाला आहे. हा दर आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभरा ला मिळाला आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांमधील हरभऱ्याचे सर्वसाधारण दर हे 4500 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे काबुली चनाला जरी चांगला दर मिळत असला तरी इतर लोकल आणि लाल हरभऱ्याचा दर कधी वाढणार याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 11-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/04/2022
बार्शीक्विंटल54360045814550
बार्शी -वैरागक्विंटल9450045004500
सिल्लोडक्विंटल15440045004500
भोकरक्विंटल153362144554038
हिंगोलीक्विंटल900415045454347
कारंजाक्विंटल4500433045004410
मोर्शीक्विंटल700430045004400
नांदूराक्विंटल705405144854485
राहताक्विंटल17448545514525
जळगावचाफाक्विंटल42435045254450
मलकापूरचाफाक्विंटल455420044904405
दिग्रसचाफाक्विंटल360445045954565
दर्यापूरचाफाक्विंटल2300445047904625
सोलापूरगरडाक्विंटल136420046604500
मोहोळगरडाक्विंटल20440045004470
सोनपेठगरडाक्विंटल42430045504480
जालनाकाबुलीक्विंटल113625081006700
अकोलाकाबुलीक्विंटल148630097007100
तुळजापूरकाट्याक्विंटल105420045004400
जळगावलालक्विंटल16450045004500
पवनीलालक्विंटल42450045004500
बीडलालक्विंटल82390044714379
जिंतूरलालक्विंटल109420044754400
शेवगावलालक्विंटल20440045004500
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल5440046004400
आंबेजोबाईलालक्विंटल250442545304500
उमरखेडलालक्विंटल480440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल180440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल307410044254300
जालनालोकलक्विंटल1409375046504560
अकोलालोकलक्विंटल2265420047754550
यवतमाळलोकलक्विंटल1872400045654282
परभणीलोकलक्विंटल280440046004550
नागपूरलोकलक्विंटल4543415045514451
मुंबईलोकलक्विंटल2318520057005500
वर्धालोकलक्विंटल292431044854400
परतूरलोकलक्विंटल22450046004570
देउळगाव राजालोकलक्विंटल39430045004400
परांडालोकलक्विंटल9440045004450
काटोललोकलक्विंटल565400044514250
देवळालोकलक्विंटल1439543954395
ताडकळसनं. १क्विंटल12440045004400
गंगाखेडपिवळाक्विंटल2440045004400