शेतमालाच्या उत्पन्नात वाढ करायची आहे ? मग अशा प्रकारे मादी फुलांची संख्या वाढवा . . .

vegitables
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :मादी फुलांची संख्या वाढल्याने शेतमालाच्या उत्पादनात वाढ होत असते. वेलवर्गीय पिकावरील मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी पिक चार पानांच्या अवस्थेत असताना जिबरॅलीक ॲसिड २५ पीपीएम (२.५ ग्रॅम / १०० लिटर पाणी) फवारणी करावे. त्याचबरोबर पिक सहा पानांच्या अवस्थेत असताना नेपथॅलिक ॲसेटीक ॲसिड १० पीपीएम (१ ग्रॅम / १०० लिटर पाणी) फवारावे.

नर व मादी फुल ओळखण्याची पद्धत

नर फुल : नर फुलाच्या आत छोट्या स्वरूपातील बहुसंख्य परागकण असतात. त्यामुळे पिकामध्ये परागीभवन होते. फुलाचा दांडा सरळ असेल तर ते फुल नर फुल समजावे.

मादी फुल : मादी फुल ओळखण्यासाठी फुलाच्या तळाचे निरीक्षण करावे. फुलाचा तळ फुगलेला असेल व फुलं फळाच्या छोट्या प्रतिकृती सारखे दिसत असेल तर त्या फुलाला मादी फुल समजावे. फुलाचे जायांग / किंजमंडल (परागकण घेऊन बी निर्माण करणारा स्त्री अवयव) मोठे असेल तर ते फुल मादी फुल समजावे.