पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात तापमानाचा पारा कमाल ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे. तर विदर्भांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार येत्या ३० मार्च पासून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांसोबतच राज्यातील इतर भागात देखील तापमान वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढली असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा हे उष्णतेच्या लाटेचं सावट आहे. या आधी 17 ते 19 मार्च या काळात कोकण आणि विदर्भात ही लाट आली होती. आता आजपासून 31 तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट असणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातल्या काही शहरांचा पारा तर 43 अंशांपार गेला आहे. दुपारच्या वेळेत अतीनील किरणांची तीव्रता अधिक असल्यानं पुढील किमान चार दिवस दुपारच्या उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.काल (सोमवार) सलग सहाव्या दिवशी अकोल्यात राज्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. आज अकोल्यात कमाल तापमानाचा पारा 42.9 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरीच्या 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

29 मार्च -आज दिनांक 29 मार्च रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

30 मार्च – 30 मार्च रोजी जळगाव ,औरंगाबाद, अहमदनगर, जालना ,परभणी ,हिंगोली, वाशिम, अकोला ,अमरावती, आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

31 मार्च – दिनांक 31 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा ,अकोला ,वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली ,परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

1 एप्रिल – जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली यांना एक एप्रिल साठी अलर्ट देण्यात आला आहे.