हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच आज दि. 26 एप्रिल रोजी बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दूपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उन्हाळी भुईमूग : वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मार होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
केळी: केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.
आंबा : काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा तसेच काढणी केलेल्या आंबा फळांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
द्राक्ष : द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान द्राक्ष वेलींना आधार द्यावा.
सीताफळ : नविन लागवड केलेल्या सीताफळ बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा.
भाजीपाला
भाजीपाला पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज, कांदे पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. फुल पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.