हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्रच पावसानं दमदार हजेरी (Weather Update) लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसानही झालंय तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्या ठिकाणी मात्र शेतीची काम जोमात सुरू आहेत. दरम्यान आज दिनांक 11 जुलै रोजी राज्यातल्या सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. यात पुणे, सातारा, रत्नागिरी ,रायगड, पालघर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, औरंगाबाद जालना, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच हिंगोली नांदेड परभणी भंडारा या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात 174 मिलिमीटर पावसाची नोंद.
मागच्या तीन-चार दिवसांपासून पुणे जिल्हा मध्ये सर्वत्र जोरदार पाऊस पडतो (Weather Update) आहे. यातच लवासा या भागामध्ये 174 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे गिरगाव 87, लोणावळा 74.5, तळेगाव 59.5, बालेवाडी 55.5, भोर 55, चिंचवड 36, माळीन 32.5 ,धुळगाव 29, राजगुरुनगर 24.5, वडगाव शेरी 24.5, पाषाण 23 ,शिवाजीनगर 21.5, कोरेगाव पार्क 20.5, मगरपट्टा 17, हडपसर 13 ,शिरूर 12, ढमढेरे 12 ,पुरंदर 12.5, हवेली 9.5 ,आंबेगाव 7.5, निमगिरी 3.5, दौंड तीन, बारामती तीन, एनडीए भाग तीन ,आणि इंदापूर एक मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद दिनांक 11 सात 2022 च्या सकाळपर्यंत करण्यात आली आहे.
पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या भागावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.