हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई, पुण्यासह राज्यातील काही भागात मागच्या २४ तासात मुसळधार पाऊस (Weather Update) कोसळला. मात्र आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
१७.०९.२०२२,
आज राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी.
मुंबई ठाणे अंशता ढगाळ आकाश … pic.twitter.com/8aRVP5R2Ia— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2022
आज या भागाला अलर्ट जारी
दरम्यान, आजही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पालघर आणि रायगडला पावसाचा (Weather Update) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत.
या भागात पावसाची दमदार हजेरी
कोकणात अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. बहुतांशी भागांत पावसाच्या सरी कोसळत (Weather Update) आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर काही नद्यांची पाणीपतळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त होतेय. किनारपट्टीलगच्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Weather Update) सुरु होता. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केली होती. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, मुळशी, चासकमान या धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिल्या.सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण व जावळी तालु्क्यात काही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. नाशिक जिल्ह्यातही बहुतांश भागांत जोरदार पाऊस सुरु आहे.