Weather Update : महाराष्ट्रात वाढणार पावसाचा जोर ! येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पाऊस ओसरला असला तरी काही भागात मात्र पाऊस (Weather Update) धुमाकूळ घालतो आहे. विशेषतः विदर्भांत पावसाने दमदार हजेरी लावली आह. आज (१९) पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकल्याने विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पाऊस (Weather Update) कोसळत आहे. पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (१८) विदर्भाकडे सरकले, यातच मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. विदर्भात रविवारपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पावसाची संततधार वाढली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाड्यात ढगांची दाटी झाली होती.

‘या’ भागाला अलर्ट

आज विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसह उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.