Weather Update : 4 जूनपर्यंत मॉन्सून रत्नागिरीत येण्याची शक्यता; हवामान विभागाची माहिती!

0
5
Weather Update Today 2 June 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या कडाक्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड उकाडा (Weather Update) जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळिशीपार नोंदवले जात आहे. काही भागांत तर तापमान 45 अंशांवर गेले आहे. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता लवकरच राज्यात मॉन्सून दाखल होणार असून, तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो 4 जूनपर्यंत (Weather Update) येण्याचा अंदाज आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

वादळी पावसाची शक्यता (Weather Update Today 2 June 2024)

रेमल’ चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रिय (Weather Update) झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील. ज्यामुळे मध्य महाराष्ट्रात 2 ते 5 जूनपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मराठवाड्यात 2 ते 5 जून नांदेड, धाराशिव, लातूर येथे, तर 3 ते 4 जून रोजी बीड जिल्ह्यांत वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

दरम्यान, पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यात आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. 4 जूनपासून रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. 5 जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांत येलो अलर्ट असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

…ही तर मॉन्सूनच्या एन्ट्रीची चाहूल

आज अर्थात 2 जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार आहे. सध्या अरबी समुद्र खवळलेला आहे. तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीच्या समुद्राचा रंग देखील बदलला असून, समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी, ही मॉन्सूनच्या एन्ट्रीची चाहूल असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.