Weather Update : मान्सून परतीला पोषक हवामान; पुणे, सोलापूरसह आज ‘या’ भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :  राज्यात बहुतांशी ठिकणी काल (१९) पावसाने (Weather Update ) उघडीप दिलेली पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी माध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी ढगाळ हवामान अनुभवायला मिळाले. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले . त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान आज सकाळपासून पुणे आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. तर वातावरण देखील ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे.

मान्सून परतीसाठी पोषक हवामान

माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी (Weather Update ) पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तविला आहे. बुधवारपर्यंत माॅन्सून वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागातून माॅन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली.

आज कुठे पाऊस ?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाचा (Weather Update ) अंदाज दिला आहे. आर विदर्भासह मराठवाड्याच पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.