काय आहे ‘पशु किसान क्रेडिट कार्ड ‘? गायी म्हशींसाठी मिळतात 40-60 हजार, जाणून घ्या संपूर्ण योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालक क्रेडिट कार्ड ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत पैशाच्या अभावी शेतकऱ्यांची किंवा पशुपालकांची जनावरे आजारी पडल्यास, त्यांच्या पैशाची अभावामुळे गरीब पशुपालकांना त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत. अश्या परिस्थितीत पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत केली जाईल.अशा शेतकर्‍यांना फायदा होतो. यामुळे पशुपालक शेतकर्‍यांनाही पशुपालनास प्रोत्साहन मिळावे. यासाठी पशुपालक क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे. हे या योजनेमाघचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

आवश्यक पात्रता
–पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
–ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे.
–ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही.
–जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात.
–अश्या सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.

पशुपालक क्रेडिट कार्डचा लाभ काय ?

–पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, कोणताही शेतकरी एखाद्या गायीचा पाठपुरावा करत असेल, तर त्यांना प्रति गाय रु. ४०,००० देण्यात येईल.
–तसेच म्हशीचे पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यास पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत प्रत्येक म्हशीला रु. ६०,००० देण्यात येईल.
–जर पशुपालक शेतकऱ्याने शेळीचे पालन केले असेल, तर त्याला प्रति शेळी रु. ४,००० देण्यात येतील.
–किसान पशुपालक योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी केंद्र शासनाकडून रु. १,६०,००० पर्यंतचा निधी मिळवू शकतात.

पशु शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत कर्ज किती रुपये मिळते ?

–जर पशुधन मालकाकडे गायी असतील, तर तो प्रत्येक गायीसाठी रु. ४०,७८३ पर्यंत प्रति गाय कर्ज घेऊ शकतो.पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत हे कर्ज बँकेच्या आर्थिक मापदंडानुसार शेतकऱ्यांना हप्त्यांमध्ये दिले जाते. हे कर्ज ६ समान हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजेच रु. ६,७९७ दरमहा बँकेकडून दिले जाते. जर कोणत्याही कारणास्तव एखाद्या महिन्याचा हप्ता पशुपालक शेतकऱ्याला मिळू शकला नाही तर, त्याला पुढच्या महिन्यात पशु शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत हप्ता मिळेल.
–पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी काही लोन रक्कम मिळते, ती पशुपालक शेतकऱ्याला पुढील वर्षी ४% व्याजदरासह परत करावे लागेल.
–जेव्हा पशुपालक शेतकऱ्याला पहिल्या हप्त्याची रक्कम मिळते, तेव्हाच कर्ज परतफेड कालावधी १ वर्षापासून सुरू होते.

पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे करायचा?

पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्ड ची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल.

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे –
–शेतकरी नोंदणीची प्रत
–आधार कार्ड
–पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र

पशू शेतकरी क्रेडिट कार्ड 2021अप्लिकेशन प्रोसेस –

–पशू शेतकरी क्रेडिट कार्ड साठी ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज करू शकता.
–यासाठी आपल्याला बँकेत जाऊन पशु किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी एक फॉर्म घ्यावा लागेल.
–आपल्याला केवायसीची कागदपत्रे फॉर्ममध्ये भरावी लागतील.
–केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे.
–मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड सारखी कागदपत्रे हि जाताना सोबत ठेवावीत.