काय आहे आजची कांदा दाराची स्थिती ? पहा राज्यातील कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यात कांद्याचे कमाल दर प्रतिक्विंटलसाठी तीन हजारांच्या आतच आले होते मात्र या आठवड्याची सुरुवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली झाली आहे असे म्हणायला हरकत नाही कारण राज्यातल्या बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे कमाल दर पुन्हा एकदा तीन हजरांवर आले आहेत.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार, आज कांद्याला सर्वाधिक पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अकरा हजार 861 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता कमीत कमी दर 200 रुपये जास्तीत जास्त दर 3300 तर सर्वसाधारण दर दोन हजार 150 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. त्याखालोखाल सांगली फळ भाजी मार्केट, मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांदा ला कमाल 3200 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. तर कोल्हापूर, खेड चाकण, नागपूर, सटाणा, कामठी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल तीन हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. तर आज सर्वाधिक आवक ही लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे ही आवक 18075 क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 9-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/02/2022
KOLHAPUR—-QUINTAL441150030001600
AURANGABAD—-QUINTAL76540020001200
MUMBAI-ONION AND POTATO MKT—-QUINTAL11355200032002600
KHED-CHAKAN—-QUINTAL4000150030002000
SATARA—-QUINTAL348100026001800
MANGALWEDHA—-QUINTAL10615025001700
KARADHALVAQUINTAL17450025002500
YEOLALALQUINTAL1200050026752300
YEOLA-AANDARSULLALQUINTAL600030025522100
LASALGAONLALQUINTAL1045080025602275
LASALGAON-VINCHURLALQUINTAL1807590026612351
MALEGAON-MUNGSELALQUINTAL700070026312100
NAGPURLALQUINTAL2400200030002750
PAITHANLALQUINTAL60065024001800
CHANDVADLALQUINTAL7700150023402100
MANMADLALQUINTAL450050026502350
SATANALALQUINTAL624595030002350
PARNERLALQUINTAL1186120033002150
BHUSAVALLALQUINTAL9200020002000
DEVALALALQUINTAL393020027552500
RAHATALALQUINTAL113965029002400
AMARAWATI-FRUIT AND VEGETABLESLOCALQUINTAL240100018001400
SANGLI-PHALE BHAJIPALAMLOCALQUINTAL395980032002000
PUNELOCALQUINTAL1117780028001800
PUNE-PIMPRILOCALQUINTAL7100017001350
VAILOCALQUINTAL15100023001700
KAMTHILOCALQUINTAL30200030002800
NAGPURPANDHRAQUINTAL1740150020001875
PIMPALGAON BASAWANTPOLQUINTAL1400050025982200