आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे हरभरा दराची स्थिती ? जाणून घ्या बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये करण्यात आला आहे. सध्याचे भाव बघता हरभऱ्याचे बाजार भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत. त्या तुलनेत नाफेड वर हरभऱ्याला चांगली किंमत मिळत आहे. यावर्षी विक्रमी हरभऱ्याचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र जाणकारांच्या मते देशात 85 ते 95 लाख इतरांच्या दरम्यान उत्पन्न होईल असा अंदाज आहे. शिवाय कोरोनाचे वातावरण निवळल्यामुळे हॉटेल्स,रेस्टोरंट कडूनही मागणी वाढण्याची शक्यता आहे.

सध्याचे वातावरण पाहता आयात, नाफेडची विक्री आणि नवीन मालाची आवक या तीन गोष्टींमुळे बाजारात हरभरा दर हा पाच हजारांच्या आतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला हमीभावाने हरभरा विकावा तसेच खुल्या बाजारातील दर तीन महिन्यांनंतर हमीभाव एवढे राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार. आज काबुली चण्याला सर्वाधिक आठ हजार रुपयांचा भाव मिळाला तर हायब्रिड चण्याला सहा हजार 195 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर साध्या चण्याचे भाव अजूनही पाच हजार रुपयांच्या आतच आहेत .आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती इथं काबुली चण्याची केवळ नऊ क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता किमान भाव 6150, कमाल भाव आठ हजार, तर सर्वसाधारण भावा आठ हजार रुपये इतका मिळाला आहे. तर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं हायब्रीड चण्याला कमाल 6195 तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायब्रीड चण्याला कमाल सहा हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. त्या खालोखाल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लोकल चण्याला पाच हजार आठशे रुपयांचे कमाल भाव मिळाला. तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाफा हरभऱ्याला 5230 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. याशिवाय नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमान 5250 इतका भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/03/2022
पुणेक्विंटल33540058005600
भोकरक्विंटल98343444573945
परळी-वैजनाथक्विंटल300425044114351
मोर्शीक्विंटल1500450045554527
राहताक्विंटल21440044914471
जळगावचाफाक्विंटल284445052305230
औरंगाबादगरडाक्विंटल12425049004575
उमरगागरडाक्विंटल14401044504441
कल्याणहायब्रीडक्विंटल3540060005700
धरणगावहायब्रीडक्विंटल63438061954435
जालनाकाबुलीक्विंटल9615080008000
बीडलालक्विंटल25435043754358
कळमनूरीलालक्विंटल40400040004000
शेवगावलालक्विंटल30430045504550
उमरीलालक्विंटल56420044004300
हिमायतनगरलालक्विंटल171430044004350
उमरखेडलालक्विंटल210440045504500
उमरखेड-डांकीलालक्विंटल380440045504500
चिमुरलालक्विंटल120400045004400
जालनालोकलक्विंटल2614320045584475
अकोलालोकलक्विंटल3161420047904500
नागपूरलोकलक्विंटल6092410046524514
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल67410144404253
परतूरलोकलक्विंटल131440045004486
देउळगाव राजालोकलक्विंटल40410044704350
नेवासानिफाडक्विंटल10525052505250
ताडकळसनं. १क्विंटल45440045004400