सोयाबीनचे दर चढेच…! आज मिळाला कमाल 7770 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोयाबीनला चांगला दर मिळावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत सोयाबीनची साठवणूक केली होती. मागच्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही वाढ झपाट्याने होत आहे. सहा हजारांवर असणारा दर आता सात हजार सातशे रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यातही तज्ञांनी सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच लवकरच उन्हाळी सोयाबीन देखील बाजारामध्ये दाखल होईल. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये सध्या समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सोयाबीनच्या दरात मागील वर्षी प्रमाणे आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 7770 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एक हजार 70 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 6500 कमाल भाव 7770 तर सर्वसाधारण भाव सात हजार 200 रुपये इतका मिळाला आहे.आज सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार नऊशे 30 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आहे. तर कमाल भाव सात हजार 361 रुपये इतका मिळाला आहे दरम्यान सोयाबीनचा सर्वसाधारण भाव सहा हजार रुपये ते सात हजार दोनशे वीस रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 25-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/02/2022
शहादाक्विंटल2697569756975
औरंगाबादक्विंटल8510058005450
राहूरी -वांबोरीक्विंटल19690069006900
संगमनेरक्विंटल6706170977079
उदगीरक्विंटल4800715072507200
कारंजाक्विंटल9500662572606950
सेलुक्विंटल287637571006886
रिसोडक्विंटल6500635071356715
शिरुरक्विंटल4680068006800
तुळजापूरक्विंटल220680070507000
राहताक्विंटल16710073507200
सोलापूरलोकलक्विंटल62680570056875
अमरावतीलोकलक्विंटल9078650069756737
नागपूरलोकलक्विंटल906550077007150
अमळनेरलोकलक्विंटल30680069036903
हिंगोलीलोकलक्विंटल1500660072006900
कोपरगावलोकलक्विंटल475550072416799
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल50620067216600
मेहकरलोकलक्विंटल1070650077707200
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल337450072567230
बारामतीपिवळाक्विंटल211580169916760
लातूरपिवळाक्विंटल10933670073617220
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल31705071507100
जालनापिवळाक्विंटल4110400073007050
अकोलापिवळाक्विंटल2995600068956500
यवतमाळपिवळाक्विंटल689600071506575
चोपडापिवळाक्विंटल5720072007200
आर्वीपिवळाक्विंटल370607069006500
चिखलीपिवळाक्विंटल2449640072406820
हिंगणघाटपिवळाक्विंटल5918630073256750
भोकरपिवळाक्विंटल110635370376695
जिंतूरपिवळाक्विंटल142650071507000
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल17600069006500
दिग्रसपिवळाक्विंटल550665073607275
गेवराईपिवळाक्विंटल141600168256600
परतूरपिवळाक्विंटल98680071367100
गंगाखेडपिवळाक्विंटल45710073007100
देउळगाव राजापिवळाक्विंटल78650071007000
नांदगावपिवळाक्विंटल7710074507301
आंबेजोबाईपिवळाक्विंटल600645073517200
किल्ले धारुरपिवळाक्विंटल308580071856700
मुखेडपिवळाक्विंटल22700072007100
उमरीपिवळाक्विंटल35700072007100
मुरुमपिवळाक्विंटल903620070006600
उमरखेडपिवळाक्विंटल200590061006000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120590061006000
काटोलपिवळाक्विंटल75595067006340
सोनपेठपिवळाक्विंटल129550071617001
देवणीपिवळाक्विंटल82690072877093
बोरीपिवळाक्विंटल8680070057005