कांद्याचे भाव निराशाजनकच ; पहा आज किती मिळाला कांद्याला कमाल भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे कांदा बाजार भाव बघता शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. सध्या कांद्याला सर्वसाधारण भाव दोन हजाराच्या आतच मिळतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झालाय. नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत असतात मात्र सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचं पाणी झाल्याचे दिसून येत आहे. तर सध्याच्या बाजारांमध्ये कांद्याला कमाल भाव 2500 रुपयांपर्यंत मिळतो आहे. बाजारामध्ये कांद्याची आवक तर चांगली आहे मात्र म्हणावा तसा दर कांद्याला मिळत नाहीये.

आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार कांद्याला सर्वाधिक भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची 40 हजार 786 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव शंभर रुपये, कमाल भाव 2500 तर सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 3-3-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/03/2022
कोल्हापूरक्विंटल579640019001400
औरंगाबादक्विंटल53140018001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9672150024001950
खेड-चाकणक्विंटल300100020001500
विटाक्विंटल50100020001500
साताराक्विंटल51170017001200
राहताक्विंटल329050020001550
सोलापूरलालक्विंटल4078610025001300
येवलालालक्विंटल1000020018211450
धुळेलालक्विंटल143816017101350
लासलगावलालक्विंटल2662555120701701
जळगावलालक्विंटल123750017001000
उस्मानाबादलालक्विंटल22120020001600
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1700056019951750
पंढरपूरलालक्विंटल68330020521350
राहूरी -वांबोरीलालक्विंटल520120019001000
कळवणलालक्विंटल300040019601600
चांदवडलालक्विंटल8200100017811550
मनमाडलालक्विंटल450040017801450
कोपरगावलालक्विंटल328550017531450
कोपरगावलालक्विंटल312017517001455
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल283160017221500
भुसावळलालक्विंटल26150015001500
वैजापूरलालक्विंटल42150020001500
देवळालालक्विंटल353020020051725
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल288250020001250
पुणेलोकलक्विंटल1648960026001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल11160020001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10100022001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल60740017001050
मलकापूरलोकलक्विंटल50595015101400
वाईलोकलक्विंटल1880020001400
नाशिकपोळक्विंटल286170023001850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2400040020051700
लासलगावउन्हाळीक्विंटल350120019031680
रामटेकउन्हाळीक्विंटल5200024002200