हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध थोडे नरमले असले तरी अद्याप संपलेले नाही. या युद्धाचा परिणाम केवळ तेलावर होणार नाही तर अन्नधान्यावरही होणार आहे. या युद्धाच्या परिणामामुळे अनेक देशातील अन्नधान्य महाग होऊ शकते. या युद्धाचा परिणाम थेट जेवणाच्या तटावर होणार असून घास महागण्याची शक्यता आहे. जगाला सर्वाधिक अन्नधान्याचा पुरवठा युक्रेनमधून केला जातो. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासह आशिया खंडातील प्रमुख राष्ट्रांना अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरं जाव लागू शकते.
काय आहे युक्रेन सरकारचा निर्णय
–यूक्रेन सरकारने गहू सहित अनेक अन्नधान्याच्या निर्यातीवर प्रतिबंध केला आहे.
— युद्ध अधिक काळ चालल्यास देशांतर्गत नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी यूक्रेनने अन्नधान्याचा साठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
–चालू आठवड्यात युक्रेन सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार, बाजरी, साखर, गहू तसेच जीवनपयोगी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
–अभूतपूर्व मानवी संकटाच्या काळात देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्यातीवर प्रतिबंधाची आवश्यकता असल्याचं यूक्रेन सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे.
रशिया, युक्रेन गव्हाचे मोठे निर्यातदार
–रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे
–युक्रेनचा गव्हाच्या उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक लागतो.
–भारत रशियानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
–दरवर्षी रशिया आणि युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होते. दोन देश मिळून जवळपास जागतिक स्थरावर तीस ते चाळीस टक्के गव्हाची निर्यात करतात. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने निर्यात ठप्प आहे.
–भारताला फायदा होऊ शकतो. भारतातून गव्हाच्या निर्यातीत वाढ होऊ शकते.