सोयाबीनच्या दरात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा पाच टक्क्यांनी घटल्याचे युएसडीने म्हंटले आहे. जागतिक उत्पादन 3,638 लाख टनांवर स्थिरावेल असाही अंदाज आहे. जागतिक सोयाबीन उत्पादन घटल्यामुळे वापर वाढल्याचे युएसडीने म्हंटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारले आहेत आणि याचाच परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर हे जाणवत आहे. गुरुवारी प्रक्रिया प्लांटने सोयाबीनच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे बाजारातील दरही वाढू शकतात असं जाणकारांचं मत आहे. सोयाबीनचे गळपही दोन टक्क्यांनी वाढले आहे. यंदा जागतिक सोयाबीन गाळप 3151 लाख टन होईल तर पुढील हंगामासाठी शिल्लक साठा बारा टक्क्यांनी घटेल असं हे युएसडीने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

जागतिक विचार करिता सोयाबीन उत्पादनामध्ये ब्राझील हा देश आघाडीवर आहे. इथेही उत्पादनात आठ टक्‍क्‍यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर अर्जेंटिना इथं सहा टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. याशिवाय अमेरिकेमध्ये पाच टक्क्यांनी सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे असं यूएसडी च्या अहवालात म्हटलं आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे.

आज किती मिळाला कमाल दर ?
दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार समिती मधील बाजार भावानुसार आज सर्वाधिक भाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून हा भाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल साठी आहे. आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 575 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव सहा हजार चारशे रुपये ,कमाल भाव आठ हजार रुपये तर सर्वसाधारण भाव सात हजार 600 रुपये इतका राहिला. त्याखालोखाल कोपरगाव सात हजार 699, मेहकर सात हजार 475, जालना 7600, गंगाखेड 7600 ,नानगाव 7404, आंबेजोगाई 7600, औसा 7577, देवडी सात हजार 700 रुपये इतके कमाल भाव सोयाबीनचा आज मिळाले आहेत. तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे सहा हजार पाचशे ते सात हजार 400 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 11-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/03/2022
जळगावक्विंटल14700070157015
औरंगाबादक्विंटल8620071506678
सिल्लोडक्विंटल15680073007000
उदगीरक्विंटल3650745074667458
कारंजाक्विंटल6000675073757175
परळी-वैजनाथक्विंटल900715174607271
लोहाक्विंटल54708172617225
राहताक्विंटल1700070007000
धुळेहायब्रीडक्विंटल6650573006505
सोलापूरलोकलक्विंटल82540573257100
नागपूरलोकलक्विंटल575640080007600
कोपरगावलोकलक्विंटल335700076997269
मेहकरलोकलक्विंटल780630074757000
चाळीसगावपांढराक्विंटल10600069006600
जालनापिवळाक्विंटल3197630076007300
अकोलापिवळाक्विंटल825545573407150
बीडपिवळाक्विंटल86650173006976
पैठणपिवळाक्विंटल3610161016101
भोकरपिवळाक्विंटल82670772006953
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल301700072007100
परतूरपिवळाक्विंटल17695073307240
गंगाखेडपिवळाक्विंटल45740076007400
देउळगाव राजापिवळाक्विंटल11500072007200
नांदगावपिवळाक्विंटल15690074047251
आंबेजोबाईपिवळाक्विंटल460685076007450
मंठापिवळाक्विंटल39700075007250
औसापिवळाक्विंटल1109730175777515
चाकूरपिवळाक्विंटल50728173647350
उमरीपिवळाक्विंटल40700072007100
मुरुमपिवळाक्विंटल67725073517301
पाथरीपिवळाक्विंटल20400072016500
उमरखेडपिवळाक्विंटल290670070006900
काटोलपिवळाक्विंटल36575069006500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल210550073006500
सोनपेठपिवळाक्विंटल233680073517200
देवणीपिवळाक्विंटल74745577007577