सोयाबीनचे दर स्थिर ; पहा आज किती मिळाला कमाल भाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीनचे सर्वसाधारण दर पाहता हे दर सात हजार रुपयांवर स्थिर आहेत. काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमाल भाव हा सात हजार शंभर आणि त्याहून जास्त आहे तर अगदी बोटावर मोजण्याइतपत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सात हजार 400 ते 600 रुपयांपर्यंत कमाल भाव मिळतो आहे.

आज(१६) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक दर हा मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून हा दर सात हजार 600 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 120 क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव सहा हजार आठशे रुपये, कमाल भाव 7600 आणि सर्वसाधारण भाव सात हजार दोनशे रुपये मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. त्याखालोखाल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे रुपये, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार दोनशे वीस रुपये इतका भाव मिळाला आहे तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे सहा हजार रुपये ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे १६-३-२२ सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/03/2022
माजलगावक्विंटल137500069256800
राहूरी -वांबोरीक्विंटल295650069006700
सिल्लोडक्विंटल15680070007000
उदगीरक्विंटल3100720072207210
कारंजाक्विंटल4000662571757050
राहताक्विंटल9681171517000
वडवणीक्विंटल1696869686968
सोलापूरलोकलक्विंटल36685071557100
हिंगोलीलोकलक्विंटल700685072007025
कोपरगावलोकलक्विंटल195500071507050
मेहकरलोकलक्विंटल1050620071906800
मेहकरनं. १क्विंटल120680076007200
जालनापिवळाक्विंटल1052650073006950
अकोलापिवळाक्विंटल1739550071306500
मालेगावपिवळाक्विंटल37670069256870
चिखलीपिवळाक्विंटल310650071666833
बीडपिवळाक्विंटल177668768816732
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल269670069006800
जिंतूरपिवळाक्विंटल100700071807100
परतूरपिवळाक्विंटल21694070907000
गंगाखेडपिवळाक्विंटल48720074007200
देउळगाव राजापिवळाक्विंटल6680070457000
तळोदापिवळाक्विंटल1690071007000
नांदगावपिवळाक्विंटल38596068736401
तासगावपिवळाक्विंटल42650068006550
मुरुमपिवळाक्विंटल114640070006700
उमरगापिवळाक्विंटल3670071806850
बसमतपिवळाक्विंटल469698072707168
उमरखेडपिवळाक्विंटल310680070006900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100680070006900
काटोलपिवळाक्विंटल20550067516000