शिवारात बहरतय उन्हाळी सोयाबीन ; संधीचं सोनं करा , वाचा कृषी तज्ञांचा सल्ला

Soyabean + Red Gram Crop Demo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र यंदा उन्हाळी सोयाबीनचे पीक जोमात आहे. कृषिविभागाने यंदा योग्य नियोजन करून उन्हाळी सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला होता. सध्या उन्हाळी सोयाबीन बहरात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा योग्य निर्णयच पुढे फायद्याचा ठरणार आहे. सध्या सोयाबीनला चांगला मिळतो आहे. मात्र त्याच्या मोहात न पडता शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे आगामी खरिपाच्या पेरणीसाठी ठेवावेत. यंदा उन्हाळी सोयाबीनची विक्रमी क्षेत्रावर लागवड झाली आहे. याचा सोयाबीनच्या बिजोत्पादनासाठी उपयोग करावा असा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

कसे मिळवाल प्रमाणीत बियाणे ?
–येत्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या एमएयूएस 71, एमएयूएस 162, एमएयूएस 612, फुले किमया, फुले संगम या वाणांचा 6 हजार 996 हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे.
–बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बॅंक पासबूकची झेरॅाक्स ही जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
–त्यानंतरच आरक्षण करुन घेतले जाणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी एका मध्यमाला माहिती देताना सांगितले आहे.

बीजोत्पादनावर भर देणे गरजेचे
उन्हाळी हंगामातील सोयाबीनमधून उत्पादनाची आशा न बाळगता शेतकऱ्यांनी थेट बीजोत्पादन करुन बियाणे करावे असा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून दिला जात आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा मुळात हाच उद्देश आहे. बीजोत्पादन करुन शिल्लक सोयाबीन विक्री केले तर फायदा शेतकऱ्यांचाच आहे. पण आहे ते सोयाबीन विकून पुन्हा बियाणांसाठी भटकंती करण्यापेक्षा बीजोत्पादनावर भर देणे गरजेचे आहे.