काळजी घ्या ! उद्यापासून राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी

heat wave
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वाढत्या तापमानामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमान ४० अंशांच्या वर पोहचले आहे. तर काही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहचले आहे. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या काही भागात गुरुवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली.

दरम्यान पुढील ४ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यातही ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक २८ एप्रिल रोजी जळगाव येथे सर्वाधिक ४५. ६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

हवामान खात्याकडून अलर्ट जारी

२९ एप्रिल -भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पावसाची शक्यता नाहीये मात्र अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

30 एप्रिल -रोजी अकोला, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या भागाला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करण्यात आली आहे.

1 मे – दिनांक 1 मे रोजी अकोला, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर नागपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कुठे किती तापमान ?
दिनांक 28 एप्रिल रोजी नोंदविण्यात आलेले राज्यातील काही भागातील कमाल तापमान पुढील प्रमाणे. जालना 42.6, सातारा 41.2, परभणी 43.4, चिकलठाणा 42, पुणे 41, सोलापूर 43.2, मालेगाव 43.4, नाशिक 41.1, बारामती 43.5 जळगाव 45.6 नांदेड 42.8