Weather Update : राज्यात ढगाळ हवामान आणि हलका पाऊस…

farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आज (२२) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

सध्याची हवामान स्थिती पाहता, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून त्याच्या सर्वसामान्य स्थितीमध्ये आहे. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या (Weather Update) उपसागरापर्यंत हा पट्टा सक्रिय सक्रिय आहे. झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, पश्‍चिम किनारापट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाने उघडीप दिली आहे. गुरुवारी (२१) ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांचा लपंडाव सुरू होता. आज (२२) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पूर्व मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.

या भागात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस

राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील (Weather Update) इगतपुरी येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर गोंदियातील अर्जुनी मोरगाव येथे ७० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.