Weather Update Today : महाराष्ट्रात पाऊस झाला गायब! अनेक भागात कडक उन्ह, आजचा हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update Today : ऑगस्ट महिन्यात चालू झाल्यापासून राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता तो अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यात ढगाळ वातावरण राहणारा असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप असताना उत्तर भारतात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे . त्यामुळे उत्तराखंड मधील नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे देखील आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

त्याचबरोबर हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पालघरमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकणातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पुणे आणि काही महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाचा जोर कमी असल्याचे चित्र आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागच्या आठवड्याभरापासूनच पावसाने उघडीप दिली आहे .

मात्र जुलै महिन्यात चांगला मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला होता त्या मुसळधार पावसामुळे चार धरणांमध्ये मुबलक पाणी साठा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाले असल्याची माहिती मिळत आहे.

माहितीनुसार, खडकवासला प्रकल्पामधील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये आतापर्यंत जवळपास २६.०७ टीएमसी म्हणजेच 89.84 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र मागच्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने चारही धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे.

घराबाहेर पडण्याआधी इथे पहा हवामान अंदाज

तुम्हाला जर घराबाहेर पडण्याआधी हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये हवामान अंदाज हा ऑप्शन सिलेक्ट करून त्यामध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकतात त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. हवामान अंदाज सोबतच तुम्ही यामध्ये बाजारभाव, सरकारी योजना, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती मिळू शकतात तेही अगदी मोफत.