Havaman Andaj : जुलै महिन्यामध्ये थैमान घातलेल्या पावसाने ऑगस्ट महिना सुरू होताच विश्रांती घेतली. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिले तर काही ठिकाणी तुरळक सारी बरसल्या आहेत. मात्र हवामान विभागाने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार, 18 ऑगस्ट पासून राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आता लवकरच राज्यात पावसाच आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवून आले आहे मात्र पाहणे पाण्याआभावी पिके सुकून चालले आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जर पाऊस आला तर पीक चांगली येतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (Havaman Andaj )
18 ऑगस्टपासून पावसाचं कमबॅक
राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ उघडीप दिली होती. मात्र आता पुन्हा 18 ऑगस्ट पासून राज्याच्या विविध भागांमध्ये असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि कोकणातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कालपासूनच राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची पूरस्थिती निर्माण झाली असून 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस जोर धरेल.
तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावात पाऊस कधी पडणार याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे तर लगेचच प्लेस्टोर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे अँप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कधी तुमच्या गावांमध्ये पाऊस पडणार तसेच हवामान स्थिती काय आहे याबाबत सर्व माहिती अगदी मोफत मिळेल. त्यामुळे लगेचच हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन इन्स्टॉल करा.