Success Story : सैन्यात जाता आले नाही, पानमळा फुलवला; करतोय लाखोंची कमाई!

Success Story Of Betel Leaf Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) कास धरत कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न यावे, यासाठी राज्यातील शेतकरी सध्या पारंपरिक पिकांना मूठमाती देत नगदी पिकांची लागवड करत आहे. यामध्ये शेतकरी पान शेतीचा (विड्याचे पान) पर्याय निवडत असून, राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी पान शेती यशस्वी करून दाखवली आहे. उत्तरप्रदेशातील रायबरेली येथील तरुण शेतकरी भोलेंद्र चौरसिया याने देखील आपला पानमळा फुलवला आहे. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून अपयशाने खचून न जाता भोलेंद्र यांने हा पानमळा फुलवला (Success Story) आहे.

देशामध्ये विड्याच्या पानाची शेती (Success Story) ही पूर्वापार चालत आली आहे. खाण्यासोबत पानाचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने पानाला विशेष मागणी असते. शेतकरी भोलेंद्र चौरसिया हे शिक्षणानंतर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगून होते. मात्र कोरोना काळात सैन्य भरती थांबल्याने आणि त्याचे वय वाढल्याने नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यांना सैन्यात भरती होताना सातत्याने अपयश आले. मात्र खचून न जाता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पान शेतीची निवड केली असून, मागील तीन वर्षांपासून त्यांना पान शेतीच्या माध्यमातून वार्षिक 3 ते 4 लाख रुपयांची कमाई होत आहे.

वार्षिक 3 ते 4 लाखांचे उत्पन्न (Success Story Of Betel Leaf Farming)

भोलेंद्र चौरसिया सांगतात, पान लागवडीसाठी दीड बिघ्यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला आहे. पहिल्या वर्षी पान लागवडीतून विशेष उत्पन्न मिळत नाही. मात्र दुसऱ्या वर्षांपासून उत्पन्न सुरु होऊन, सध्या आपल्याला त्या दीड बिघ्यातून 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पान शेतीसाठी देशी, महोबा, बांग्ला (कलकत्ता) या पानांच्या प्रजाती उत्तम आहेत. त्यांनी आपल्या शेतात या जातींची निवड केली असून, त्यातून उत्पादित होणारे पान ते वाराणसी, फैजाबाद, लखनऊ व रायबरेली या मार्केटमध्ये पाठवत आहेत. पानशेती करायला लागल्यापासून आपल्या जीवन मानात सुधारणा झाल्याचे भोलेंद्र सांगतात. त्यामुळे आपण आपल्या पान शेतीत मन लावून काम करत असल्याचे ते सांगतात.

फेब्रुवारीच्या अगोदर लागवड

रायबरेली जिल्ह्यात सध्या अनेक शेतकरी पान शेती करत असून, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पान शेती करताना विशेष फायदा होत असल्याचे ते सांगतात. पान लागवड ही फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर केली जाते. यात प्रामुख्याने नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी अशी दोन टप्प्यांमध्ये पानाची शेती केली जाऊ शकते. यासाठी जमीन चांगली तयार करून, बेडवर पानाची लागवड केली जाते. पानाचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था त्यांनी केली आहे. ज्यामुळे त्यांना पानाचे गुणवत्तापूर्ण आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.