Weather Update: फेब्रुवारी महिन्यात थंडीची हुडहुडी होणार कमी! मात्र एल-निनोची स्थिती कायम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला आहे. त्यानुसार, देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पावसाचा अंदाजही सरासरीपेक्षा (Weather Update) अधिक आहे.

थंडी कमी राहण्याची शक्यता (Weather Update)
जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता, यंदा हंगामात थंडी कमीच आहे. फेब्रुवारी महिन्यातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान (Temperature) सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने गारठा कमी राहण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा या राज्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

सरासरी पाऊस अधिक पडण्याची शक्यता (Above Average Rainfall)

फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1971 ते 2020 या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी 22.7 मिलीमीटर पाऊस पडतो. यावर्षी देशात 119 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एल-निनो स्थिती कायम (El- Nino Conditions Remain)
प्रशांत महासागरात सध्या तीव्र एल-निनो स्थिती असून, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत एल-निनो स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू निवळण्याची शक्यता आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.