हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या शेतकरी नवनवीन पिकांची (Vegetable Farming ) लागवड करत आहे. नवीन पिकांच्या लागवडीमुळे बाजारात त्यास अधिक मागणी असल्याने शेतकऱ्यांना अधिकचा दरही मिळतो. या नवीन पिकांमध्ये प्रामुख्याने भाजीपाला पिकांची लागवड करताना अधिक शेतकरी दिसतात. अशातच सध्या पार्सली (अजमोद) या कोथिंबीरी सारख्या असलेल्या भाजीपाल्याची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ही पार्सली भाजी प्रामुख्याने सॅलड, भाजी, कढी आणि सूप बनवताना वापरली जात असल्याचे तिला बाजारात चांगली मागणी असते. याशिवाय या पार्सली भाजीचे (Vegetable Farming) अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे उच्चभ्रू लोकांकडून तिला अधिकचा दर देखील मिळतो.
कोथिंबीरीशी आहे साध्यर्म (Vegetable Farming Parsley Cultivation)
भारतीय आहारामध्ये कोथिंबिरीला विशेष महत्व आहे. कोथिंबिरीचा उपयोग विशेषकरून प्रत्येक भाजीमध्ये केला जातो. तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून तिला मोठी मागणी असते. मात्र, पार्सली हा विदेशी भाजीपाला असून, तो कोथिंबिरीला पर्याय म्हणून भारतात समोर आला आहे. पार्सलीची विक्री ही बाराही महिने होते. मात्र पार्सली ही भाजी कोथिंबिरीशी साधर्म्य साधत असली तरी या भाजीचे (Vegetable Farming) गुणधर्म हे कोथिंबिरीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. नॉन-व्हेज करताना वापरल्या जाणाऱ्या खास मसाल्यांमध्ये प्रामुख्याने या भाजीचा वापर केलेला आढळतो. अर्थात या भाजीला सुखवून मग मसाल्यामध्ये वापर केला जातो.
काय आहेत आयुर्वेदिक गुणधर्म?
पार्सलीच्या उगवणीनंतर शेतात गेल्यास कोथिंबिरीसारखा एक प्रकारचा सुगंधी वास दरवळतो. पार्सली या भाजीमध्ये (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट, खनिजे, प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न असते. तिच्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे सध्या ती लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. या भाजीच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. याशिवाय हाडाची समस्या असलेल्या रुग्णांनी नियमित या भाजीचे सेवन केल्यास, अशा रुग्णांना या भाजीमुळे खूप फायदा होतो. याशिवाय कोड आणि युरीनसंबंधित समस्येसाठी देखील ही भाजी गुणकारी मानली जाते.