हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी (ता.19) जोरदार गारपिटीसह पाऊस (Weather Update) झाला. भंडारा, वर्धा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, भात, मका या पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या शनिवारपासून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये भाग बदल गारपिटीसह अवकाळी पाऊस होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हिरावला गेला असून, झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे (Weather Update) करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मंगळवारी कुठे झाला पाऊस? (Weather Update Today 20 March 2024)
- भंडारा जिल्हा – साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट.
- नागपूर जिल्हा – पारशिवनी तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या गारपीटसह मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
- चंद्रपूर जिल्हा – कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली. या पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
- गोंदिया जिल्हा – सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने गहू पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
- वर्धा जिल्हा – शहरी भागासह ग्रामीण भागात गारपीट झाली. जिल्ह्यात पवनार आणि आसपासच्या परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
अशातच आजही (ता.20) राज्यातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने (Weather Update) यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा परिसरावर चक्रीय स्थिती कायम असल्याने, अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय या कालावधीत विदर्भ-मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायमी असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
कमाल तापमानात अल्प घट
दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्यातील कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार गेला होता. नागपूर या ठिकाणी उच्चांकी 43.9 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमान काहीसे कमी झाले असून, मागील 24 तासांमध्ये सोलापूर या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर गोंदिया, नाशिक, पालघर, रत्नागिरी वगळता राज्यातील सर्वच भागांमध्ये तापमानाचा पारा सध्या 35 अंशाहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.