Wheat Production : यंदा देशातील गहू उत्पादन 110 दशलक्ष टन होण्याची शक्यता!

Wheat Production In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या रब्बी हंगामात देशातील गहू उत्पादनात (Wheat Production) 2 दशलक्ष टनांनी घसरण होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 110 दशलक्ष टन अर्थात 11 कोटी टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यावर्षी देशातील रब्बी हंगामात एकूण 112.02 दशलक्ष टन (12 कोटी टन) गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अर्थात सरकारच्या अंदाजापेक्षा यंदा 2 दशलक्ष टन कमी गहू उत्पादन (Wheat Production) होण्याची शक्यता आहे.

तीन संस्थांचा सुरात सूर (Wheat Production In India)

जागतिक पातळीवरील संशोधन संस्था असलेल्या बॉडी मास इंडेक्सच्या अंदाजानुसार (बीएमआय) यंदा भारतात 110 दशलक्ष टन गहू उत्पादन (Wheat Production) होण्याचा अंदाज आहे. अमेरिकी कृषी विभागाच्या अंदाजानुसार, यंदा भारताचे गहू उत्पादन 110.6 दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज आहे. तर तिसरी जागतिक संस्था अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) देखील भारताचे गहू उत्पादन 110 दशलक्ष टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामुळे आता केंद्र सरकारच्या अंदाजापेक्षा गहू उत्पादनात 2 दशलक्ष टनांनी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागणीत 2.5 टक्के वाढ

या संस्थांच्या आकडेवारीनुसार, 2023-24 यामध्ये भारतातील गव्हाची मागणी 2.5 टक्के वाढून, ती 111.4 दशलक्ष टन इतकी राहण्याची शक्यता आहे. याउलट सध्या देशातील मागणीच्या तुलनेत 1.4 दशलक्ष टन गहू उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. देशातील गहू उत्पादनात घट होण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये असलेली दुष्काळी स्थिती आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मागील काही कालावधी झालेला अवकाळी पाऊस, यामुळे गहू पिकाला फटका बसलेला आहे.

दुष्काळ, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट

जागतिक पातळीवरील संशोधन संस्था असलेल्या बॉडी मास इंडेक्सच्या म्हणण्यानुसार, भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये दुष्काळी स्थितीमुळे या भागातील गहू पीक यंदा घटले आहे. तर मागील काही काळापासून सातत्याने उत्तरेकडील गहू उत्पादक राज्यांमध्ये पाऊस अवकाळी पाहायला मिळत आहे. ज्यामुळे गहू पिकाचे नुकसान होऊन, उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.