Weather Update : यंदा समाधानकारक पावसाळा होणार; हवामानशास्त्रज्ञांची माहिती!

Weather Update Satisfactory Monsoon This Year
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी (Weather Update) आनंदाची बातमी असून, अल निनोने काढता पाय घेतला आहे. लवकरच ला-नीना त्या जागी सुरु होणार आहे. देशातील वातावरणात लवकरच एक थंड वाऱ्यांची फेज सुरु होणार असून, यावर्षी देशात मॉन्सून काळात चांगला पाऊस पडणार आहे. अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि हवामानशास्त्रज्ञ एम.राजीवन यांनी एका नामांकित वृत्तसमूहाला दिली आहे. एल-निनो आणि ला-नीना या दोन्ही घटनांचा हवामानाच्या बाबतीत छत्तीसचा आकडा आहे. अर्थात ज्या ठिकाणी अल-निनोमुळे दुष्काळ पडतो. त्या ठिकाणी ला-नीना पाऊस (Weather Update) पाडत असतो. असेही त्यांनी म्हटले आहे.

गरम हवेचे झोत थांबणार (Weather Update Satisfactory Monsoon This Year)

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि हवामानशास्त्रज्ञ (Weather Update) एम.राजीवन यांनी म्हटले आहे की, “एल-निनोने काढता पाय घेतला आहे. पॅसिफिक महासागरातील वातावरणातील गरम हवेचे झोत थांबणार असून, थंड वाऱ्याचे झोत येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता यंदाच्या मॉन्सूनच्या काळात पावसाची परिस्थिती उत्तम असणार आहे. येत्या मे महिन्यात पुन्हा एकदा विविध हवामान संस्थांकडून लवकरच चांगली बातमी मिळणार आहे.” दरम्यान, मागील वर्षीच्या मान्सूनच्या बाबतीत अल-निनोमुळे पावसाळयात मॉन्सूनचा पाऊस कमी झाला. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. मात्र, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक थेंबही पाऊस झाली नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना खरिपात पिकांना झटका बसला.

काय आहे आयओडी?

इंडियन ओशन डायपोल (आयओडी) अर्थात आयओडीचा ज्यावेळी हवामानावर परिणाम दिसून येतो. त्यावेळी अल-निनो देखील आयओडीसमोर तटस्थ होऊन, चांगला पाऊस होण्यास मदत होते. मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हेच दिसून आले. ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे पाऊस झाला नाही. आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) पॉझीटीव्ह झाल्याने सप्टेंबर महिन्यात सरासरी 94 टक्के मान्सूनचा पाऊस झाला.

ला-नीना काळात पडतो अधिक पाऊस

यावर्षी ला-नीना योग्य वेळी ऍक्टिव्ह झाल्यास, 1987-88 प्रमाणे भारतात विक्रमी पाऊस होईल. त्यावर्षीही अल-निनोने काढता पाय घेतला आणि तात्काळ ला-नीना ऍक्टिव्ह झाला. ज्यामुळे आदल्या वर्षी अल-निनो कार्यरत असताना दुसऱ्या वर्षी 1987-88 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे आता यावर्षी देखील अल-निनो संपताच ला-नीना ऍक्टिव्ह झाल्यास, यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.