Marigold Farming : झेंडू लागवडीसाठी हेक्टरी किती येतो खर्च? वाचा झेंडू शेतीचे नफ्याचे गणित!

Marigold Farming Cost Per Hectare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडूच्या फुलांना (Marigold Farming) वर्षभर मागणी असते. तसेच त्यांना दरही चांगला मिळतो. ज्यामुळे झेंडू लागवड करणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. झेंडूच्या फुलाच्या लागवडीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. प्रखर सूर्यप्रकाश असलेल्या भागात झेंडूची शेती चांगली बहरते. महाराष्ट्रात झेंडूच्या शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने, गेल्या दशभरात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या लागवडीतून आपली प्रगती साधली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण झेंडू लागवडीबाबत (Marigold Farming) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मुरमाड जमीन सर्वोत्तम (Marigold Farming Cost Per Hectare)

झेंडूच्या फुलांची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मात्र, झेंडू लागवडीसाठी (Marigold Farming) वालुकामय, मुरमाड जमीन सर्वोत्तम मानली जाते. झेंडू लागवडीसाठी जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 इतका असावा लागतो. यासोबतच शेतात सावलीची जागा नसावी तसेच शेतात पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था असावी. झाडे लावण्यासाठी शेत तयार करताना, तण पूर्णपणे काढलेले असावे. मशागतीदरम्यान, कुजलेले खत आणि रासायनिक खते 15-20 सेमी खोलीपर्यंत जातील अशी मिसळावीत. झेंडूची रोपे बेडवर लावावीत. शेजारील दोन बेडमध्ये एक ते दीड फूट अंतर ठेवावे. शेतात हेक्टरी 200-250 क्विंटल शेणखत टाकावे. याशिवाय 200 किलो नत्र आणि 80 किलो स्फुरद पिकांच्या वाढीदरम्यान द्यावे, ज्यामुळे फुलांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

हेक्टरी खर्च किती येतो?

झेंडूच्या फुलांच्या लागवडीतून (Marigold Farming) शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत दुप्पट उत्पन्न मिळते. झेंडूच्या फुलांच्या लागवडीच्या खर्चाबाबत सांगायचे तर, एका हेक्टरमध्ये या फुलाची लागवड करण्यापासून ते बाजारात विक्री करण्यापर्यंत शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये खर्च करावा लागतो. तर बाजारभावातील कमी-अधिक प्रमाण लक्षात घेता झेंडू पिकातून शेतकऱ्यांना कमीत-कमी दोन लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न सहज मिळतो. दर व्यवस्थित मिळाल्यास या उत्पन्नात मोठी वाढ देखील होऊ शकते. इतर कोणत्याही पिकाच्या लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न अधिक आहे. त्यामुळे शेतकरी झेंडू फुलांची लागवड करून, आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात.

किती मिळते उत्पादन?

पावसाळी हंगामासाठी झेंडू फुलांची लागवड मे महिन्यापासून सुरू होते आणि पावसाळ्यापर्यंत सुरू असते. परंतु जून महिन्यात फुलांचे उत्पादन सर्वाधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पावसाळ्यात फुलांची लागवड सप्टेंबरच्या मध्यापासून डिसेंबरपर्यंत सुरू असते. तर उन्हाळी हंगामातील झेंडू लागवड मार्चपर्यंत चालू राहते. अशा प्रकारे शेतकरी वर्षभर झेंडू फुलांचे उत्पादन घेऊ शकतात. झेंडू फुलांची योग्य पद्धतीने लागवड केल्यास, हेक्टरी 200-250 प्रति क्विंटल उत्पादन मिळते. ज्यातून बाजारभावानुसार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा सहज मिळू शकतो.